Nothing Phone 2a : Nothing चा सर्वात स्वस्त फोन, जबरदस्त फीचरसह किंमत आहे केवळ…

Nothing Phone 2a : अनेकांना Nothing चे फोन आवडतात. त्यामुळे कंपनीदेखील सतत आपले शानदार फीचर्स असणारे फोन बाजारात लाँच करत असते. कंपनीच्या सर्व फोनला बाजारात खूप मागणी असते. अशातच आता कंपनी आपला आणखी एक फोन लाँच करणार आहे.

कंपनीने सांगितले आहे की नवीन Nothing Phone 2a स्मार्टफोनला आगामी 3 वर्षांसाठी प्रमुख Android अपडेट्स देण्यात येतील. स्मार्टफोनमध्ये 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळतील. कंपनीच्या मतानुसार, नथिंग फोन (1) च्या तुलनेत या स्मार्टफोनला अनेक अपग्रेड्स दिले आहेत.

तपशील जाणून घ्या

नथिंग स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर शिवाय याच्या मागील पॅनलवर 50MP प्राथमिक आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. Nothing Phone 2a मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असून फोनच्या 5000mAh बॅटरीला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

कंपनीच्या नवीन फोनमध्ये १२ जीबी रॅम आहे आणि ८ जीबी व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट दिला आहे. यामध्ये 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असून फोन Android 14 वर आधारित NothingOS 2.5 सॉफ्टवेअर स्किन आहे. तुम्ही हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

किंमत

किमतीचा विचार केला तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या नथिंग स्मार्टफोनच्या व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 25,999 रुपयांना खरेदी करू शकता. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे.

Leave a Comment