Nothing Phone 2 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी जुलै महिन्यात जबरदस्त फीचर्ससह Nothing Phone 2 बाजारात येणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी संपुर्ण जगात एकाच वेळी नथिंग फोन 2 लॉन्च करणार आहे.
ग्राहकांसाठी या फोनमध्ये मोठी बॅटरी दिसणार आहे. यावेळी कंपनी यामध्ये 200mAh अधिक क्षमतेची बॅटरी देणार आहे. डिव्हाइस Snapdragon 8+ Gen 1 SoC द्वारे समर्थित असेल, ज्याची कंपनीने पुष्टी देखील केली आहे.
यावेळी फोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी दिसणार नाही. तर नथिंग फोन 1 मध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली होती. जागतिक स्तरावर लाँच होणारा हा फोन अमेरिकेतही एकाच वेळी लॉन्च होणार आहे.
यापूर्वी, Carl P ने देखील पुष्टी केली होती की फोनमध्ये फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8+ Gen 1 SoC दिले जाईल. Qualcomm Snapdragon 778G+ SoC पूर्वीच्या मॉडेलमध्ये देण्यात आला होता.
गतवर्षीप्रमाणेच याही वेळी कंपनीने जुलैची लॉन्चची वेळ ठेवली आहे. यावेळचे मॉडेल नथिंग फोन 1 पेक्षा चांगला अनुभव देईल, असे म्हटले आहे. नथिंग फोन 1 जुलै 2022 मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 32,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.
लॉन्च झाल्यानंतर एका महिन्यानंतर कंपनीने फोनची किंमत 1000 रुपयांनी वाढवली होती. नथिंग फोनमध्ये कंपनीने कमी किमतीत आकर्षक स्पेक्स आणि फीचर्स देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये तो यशस्वीही झाला होता.
नथिंग फोन 1 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आहे. यात फ्रंटला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात 12 GB RAM आणि 256 GB पर्यंत कमाल ऑनबोर्ड स्टोरेज मिळते. आधी सांगितल्याप्रमाणे, फोन 33W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी पॅक करतो.
कंपनीने यामध्ये वायरलेस चार्ज सपोर्टही दिला आहे. फोनला इतर सर्व स्मार्टफोन्सपेक्षा वेगळा लूक देण्यासाठी त्याला एक पारदर्शक बॅक पॅनल देण्यात आला होता, ज्यामध्ये LED लाइटिंग उपलब्ध आहे, ज्याला Glyph इंटरफेस म्हणतात.