Nothing Phone 2 । शानदार सवलतीसह हा फोन खरेदी करा 16,000 रुपयात, मिळतील जबरदस्त फीचर्स

Nothing Phone 2 । बाजारात Nothing च्या स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने कंपनीदेखील आपले अनेक स्मार्टफोन्स लाँच करत असते. या फोनच्या किमती जास्त असतात. पण तुम्ही आता तो स्वस्तात खरेदी करू शकता.

स्वस्तात खरेदी करता येईल फोन

रॅम आणि स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी, नथिंग फोन 2 च्या बेस 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये होती. त्याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी होती. काही दिवसांपूर्वी तिन्ही मॉडेल्सच्या किमती कंपनीकडून 5000 रुपयांनी कमी केल्या होत्या. आता तो फ्लिपकार्ट समर फेस्टिव्ह डे सेलमध्ये स्वस्त मिळत आहे.

तसेच या फोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट 35,999 रुपयांना विक्रीमध्ये उपलब्ध आहे. त्याचा 12GB + 256GB व्हेरिएंट 36,999 रुपयांना उपलब्ध असून 12GB + 512GB व्हेरिएंट रुपये 38,999 मध्ये उपलब्ध आहे.

Nothing Phone 2 मध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून तो फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, HDR10+ आणि 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

रॅम आणि स्टोरेजनुसार तीन प्रकारांमध्ये लॉन्च केलाय. फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. कंपनीच्या या शानदार फोनमध्ये टाइप-सी पोर्ट आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4700mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

नथिंग फोन 1 प्रमाणे, नथिंग फोन 2 मध्ये ग्लिफ इंटरफेस आणि मागील बाजूस चमकणारे एलईडी लाइट दिली आहे जे तुम्ही वेगवेगळ्या हेतूंसाठी सानुकूलित करू शकता. फोनच्या इतर खास फीचर्समध्ये 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, 15W Qi वायरलेस चार्जिंग, ब्लूटूथ 5.3, NFC आणि स्टिरिओ स्पीकर सेटअप यांचा समावेश केला आहे.

Leave a Comment