Nokia G42 5G । नोकियाने आणला नवीन 5G फोन, जबरदस्त फीचरसह किंमत आहे फक्त…

Nokia G42 5G । नोकियाने आपला नवीन 5G फोन बाजारात आणला आहे. किमतीबाबत बोलायचे झाले तर या फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, आणि वैशिष्ट्ये देखील आश्चर्यकारक आहेत.

कंपनीने हा फोन मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला होता. यात 5 जीबी व्हर्च्युअल रॅम दिली आहे. यानंतर, कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये या फोनचा 8 जीबी रिअल + 8 जीबी व्हर्च्युअल रॅम सह व्हेरिएंट लॉन्च केला होता. कंपनीचा हा फोन 256 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

जाणून घ्या Nokia G42 5G ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून या फोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याची शिखर ब्राइटनेस पातळी 560 nits इतकी असून डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी तुम्हाला यामध्ये गोरिल्ला ग्लास 3 पाहायला मिळेल. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असून प्रोसेसर म्हणून कंपनीकडून या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट दिला जात आहे.

तसेच फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत असून यात 50-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत असून साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

या फोनची ही बॅटरी 20 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय आहेत.

Leave a Comment