Nokia 5G Smartphone : मुंबई : Nokia G60 स्मार्टफोन देशात लाँच (Nokia 5G Smartphone) होण्याची दाट शक्यता आहे. HMD Global ने घोषणा केली आहे, की 5G स्मार्टफोन लवकरच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा फोन नोकिया इंडियाच्या (Nokia India) वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे, आणि येथून असे समजले आहे की हा फोन दोन रंग पर्याय आणि 6 GB आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह ऑफर केला जाईल. या फोनचा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटसह येईल आणि यात स्नॅपड्रॅगन 695 5G SoC आणि 4500mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये दिली जातील. यामध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले दिला जाईल आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, जो 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सेटअपसह येईल.
नोकियाने जारी केलेल्या ट्विटवरून असे कळले आहे, की Nokia G60 5G ची प्री-बुकिंग लवकरच सुरू होईल, आणि अनेक खास ऑफर त्यासोबत असतील. लाँच करण्याआधी कंपनीने त्याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. पण कंपनीने स्मार्टफोन केव्हा लाँच होणार आणि किंमत काय असणार याबाबत मात्र कंपनीने खुलासा केलेला नाही.
नोकियाचा हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. यामध्ये प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सल्सचा आहे. याशिवाय सेटअपमध्ये 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Nokia G60 5G स्मार्टफोन Android 12 वर काम करेल आणि यात ड्युअल सिम सपोर्ट दिला जाईल. यात 6.58-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 500 nits असेल आणि रीफ्रेश दर 120Hz असेल. याच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 वापरण्यात आला आहे. त्याच वेळी, चांगल्या कार्यक्षमतेसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट, 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज दिले जाईल. Nokia G60 5G Pro दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. यापूर्वी असे कळले होते, की ते निवडक जागतिक बाजारपेठेत सुमारे 28,000 रुपयांमध्ये सादर केले गेले होते.
- हे ही वाचा : Nokia मार्केटमध्ये करणार धमाकेदार एंट्री; लाँच करणार 5G स्मार्टफोन, जाणुन घ्या फिचर्स
- Nokia स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर! ‘हा’ जबरदस्त फोन 599 रुपयांना घरी आणा; पटकन करा चेक
- Nokia ने केलीय मोठी घोषणा..! ‘त्यासाठी’ कंपनीचा नवा प्लान तयार; बातमी आहे तुमच्या फायद्याची..
- Samsung ने लॉन्च केला ‘हा’ कमी किमतीचा भन्नाट स्मार्टफोन; डिझाईन पाहून लोक म्हणाले, उफ्फ..