Nokia 3210 : भारतीय बाजारात काही वर्षांपूर्वी Nokia 3210 चा जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत होता.
बाजारात या फोनची जबरदस्त मागणी देखील होती मात्र आता या फोनची क्रेझ कमी झाली आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन पुन्हा एकदा भारतीय बाजारात लाँच होणार आहे.
हे जाणून घ्या कि, HMD ग्लोबल कंपनीला नोकिया ब्रँडेड स्मार्टफोन बनवण्याचा परवाना मिळाला आहे. हीच कंपनी नोकियाच्या वर्धापनदिनानिमित्त Nokia 3210 लाँच करण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडिया X वर पोस्ट केलेल्या पोस्टवर एक लिंक दिली आहे. यावर आगामी स्मार्टफोन लॉन्चची माहितीही देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर माहिती दिली
कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आगामी स्मार्टफोन Nokia 3210 लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अद्याप आगामी स्मार्टफोनचे नाव जाहीर केले नसले तरी नोकिया 3210 लवकरच लाँच केला जाऊ शकतो असे मानले जात आहे. 18 मार्च रोजी Nokia 3210 च्या 25 व्या बर्थ अनिव्हर्सरीला एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
शक्तिशाली कॅमेरा सेटअप
HMD Global लवकरच त्याचा पहिला 108MP कॅमेरा फोन लाँच करू शकते. लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर HMD स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा रियर कॅमेरा 108MP असू शकतो, जो HMD लोगोसह येईल.
नवीन काय असेल?
नोकियाचा आगामी स्मार्टफोन Nokia 3210 पूर्वीपेक्षा खूपच वेगळा असेल. यामध्ये मोठ्या डिस्प्लेसह पॉवरफुल बॅटरी देण्यात येणार आहे.