दिल्ली : कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती असतानाच नोए़डा (Noida) जिल्ह्यातील मुले कोरोना संक्रमित (Corona Positive) आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी आठ मुले कोरोना पॉजिटिव असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये आता 15 बालकांचा समावेश आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने आणखी काही शाळांमधील एकूण आठ मुलांचे तपासणी अहवाल पॉजिटिव असल्याची खात्र केली आहे.
मंगळवारच्या कोरोना तपासणी अहवालात आठ शाळकरी मुलेही आहेत, असे अधिकारी मनोज कुशवाह यांनी सांगितले. सीएमओ डॉ. सुनील कुमार शर्मा यांनी सांगितले, की खेतान शाळेतील 13 मुले आणि तीन शिक्षक संक्रमित असल्याची यादी शाळा व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे. व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून 17 एप्रिलपर्यंत शाळा बंद (School Closed) ठेवल्या आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलांची चाचणी कोणत्या लॅबमध्ये केली, याची चौकशी सुरू आहे. सध्या लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. इतर शाळांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अशा मुलांची फेरतपासणी करण्याची तयारी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. वास्तविक, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिकणारी मुले एकापाठोपाठ एक कोरोना संक्रमित होत आहे. दुसरीकडे, नोएडा कोविड हॉस्पिटलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दोन मुलांना सौम्य लक्षणांच्या तक्रारींवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दोघांचे रिपोर्ट पॉजिटिव आले होते. सोमवारी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असून, अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Corona Update : ‘त्या’ 10 देशांमुळे वाढलेय जगाचे टेन्शन.. पहा, काय आहे ‘तिथे’ कोरोना परिस्थिती..