No Traffic Challan Service: अहमदाबाद (Ahmedabad): गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका (Assembly elections) होत आहेत. परिणामी सध्या सर्वच राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात करत आहेत. रेवडी वाटप (political strategy of distributing Rewadi) करण्याच्या राजकीय धोरणाला विरोध करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा पक्ष यातही आघाडीवर आहे. अनेक घोषणा आणि खैरात करण्याच्या राजकीय धोरणात आता गुजरात सरकारने (Gujarat government) तर मोठी उडी घेऊन लोकांना मोकाट रान उपलब्ध करून दिले आहे.
- Traffic Rules: तर ‘त्या’ महिलांना 5 लाखांचा दंड; आणि लायसन्सही होणार आहे रद्द..!
- Human trafficker: बाब्बो भयंकरच की.. म्हणून ‘त्यांच्या’वर मानवी तस्करांची नजर..!
- Pune traffic : वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांच्या चुकांवर पालिकेचे बोट
होय, गुजरातमध्ये काहीजण जुनी पेन्शन योजना (old pension scheme) पूर्ववत करण्याचे आश्वासन, तर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (compensation to the farmers) देण्याचे जाहीर बोलत आहेत. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपने गुजरातमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीमुळे (Diwali) 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान वाहतूक चलन जारी केले जाणार नाही, अशी ही घोषणा आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी (Gujarat’s Minister of State for Home Harsh Sanghvi) यांनी ही घोषणा केली आहे. “ट्रॅफिक पोलिस दिनांक 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून कोणताही दंड वसूल करणार नाहीत. याचा अर्थ तुम्ही (म्हणजे नागरिक) वाहतुकीचे सर्व नियम पाळणार नाहीत (not follow the traffic rules) असा नाही. तर, नियम मोडणाऱ्यांना पोलिस फक्त समजावून सांगतील. पावती कटणार नाही. जनतेला वाहतुकीचे नियम पाळावे लागतील मात्र चुकून वाहतूक नियमांचे (traffic rules are violated by mistake)उल्लंघन झाल्यास पोलिस त्यांचे चालान कापणार नाहीत,” असे ते म्हणाले आहेत.