Nitish Kumar Vs PK : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) अजूनही भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याच्या राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या दाव्यावर नितीश कुमार यांनी भाष्य करण्यास नकार दिला. नितीश म्हणाले की, प्रशांत किशोर काहीतरी बोलत राहतात. प्रशांत किशोर यांनी गुरुवारी दावा केला, की नितीश कुमार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत आणि परिस्थिती कायम राहिल्यास ते परत एकदा भाजपबरोबर (BJP) युती करू शकतात. यावर उत्तर देताना नितीश म्हणाले की, यावर काय बोलू. ते अर्थहीन बोलत राहतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते अशी विधाने करतात. तो कोणत्या पक्षासाठी काम करतो हे सर्वांना माहीत आहे.
किशोर यांनी असेही म्हटले होते, की नितीश कुमार यांनी (JDU) खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपशी संवादाचा मार्ग खुला ठेवला होता. ते म्हणाले की, भाजपशी संबंध तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी हरिवंश यांना पायउतार होण्यास सांगायला हवे होते. ते या पदावर कायम राहिले असते तर भविष्यात त्यांची (JDU) मधून हकालपट्टी होऊ शकली असती. किशोर यांनी बुधवारी पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका जाहीर सभेत हे सांगितले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री म्हणाले, की त्यांना (किशोर) जे काही म्हणायचे आहे ते बोलू द्या. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. पूर्वी ते माझ्याबरोबर होते. हे खरे आहे की असे काही लोक आहेत ज्यांना मी बढती दिली, त्यांनी माझी फसवणूक केली.
- Must Read : BJP New Mission : लोकसभेसाठी खास प्लान; थेट केंद्रीय मंत्रीच येणार मैदानात; जाणून घ्या..
- Bihar : भाजपविरोधात राजकारण जोरात.. नितीश कुमार यांच्यासाठी ‘JDU’ चा प्लान तयार; जाणून घ्या..
- Congress : काँग्रेसमध्ये भूकंप..! 80 पेक्षा जास्त आमदारांनी दिला राजीनामा; पहा, ‘तेथील’ सरकार टिकणार का ?
- Bihar : नितीश कुमार यांच्या JDU ला ‘या’ राज्यात जोरदार झटका; ‘इतक्या’ आमदारांनी केला भाजपात प्रवेश
सध्या बिहारमध्ये राजद (RJD) आणि जेडीयू सरकार आहे. या सरकारमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) उपमुख्यमंत्री आहेत. नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपबरोबरील युती तोडली होती. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर रहावे लागले. या परिस्थितीत राज्यातील राजकीय (Bihar Politics) समीकरणे बदलली आहेत. कधीकाळी नितीश कुमार यांच्याबरोबर असलेले प्रशांत किशोर आता त्यांच्या विरोधात आहेत. त्यांच्याकडून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र नितीश कुमार त्यांच्या वक्तव्यांवर अतिशय सावध प्रतिक्रिया देत आहेत.