Nitin Udamle । अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेस सरकारच्या काळात झालेले शेतकरी विरोधी कायदे शेती विकासातील मोठा अडसर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सरकारची दुसरी टर्म सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कृषी विकास पर्व सुरु झाले आहे. अशातच आता तिसऱ्या टर्म मध्ये पुढची पाच वर्षे शेतीसाठीच समर्पित असून हे आशेचे दिवस मोदी सरकारने दाखवले आहेत, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा प्रारंभ भाजपाचे नेते प्रा. भानुदास बेरड यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग, किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री रमेश पिंपळे, किसान मोर्चा महानगर अध्यक्ष राजू एकाडे, किसान मोर्चाच्या उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष अंकुश काळे, अंबादास शेळके,सुरेश लालबागे, सचिन आघाव,हर्षल आगळे, पंडित वाघमारे, गौतम कराळे पा, इसळकचे सरपंच संजय गिरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रेचा अहमदनगर जिल्ह्याचा शुभारंभ नगर तालुक्यातील इसळक – निंबळक येथे निसर्गसृष्टी गोपालन संस्था येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील गावोगावी जाऊन किसान मोर्चा चे कार्यकर्ते व पदाधिकारी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या शेतकरी आणि शेती विषयक योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रा. बेरड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आणि शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी कर्ज मुक्ती, त्याचे उत्पन्न दुपटीने कसे वाढेल यावर भर देण्यात आला. आता तर खतांचा काळाबाजार पूर्णपणे थांबला आहे. बी बियाणे यांच्या किमती देखील नियंत्रणात आहेत. ते सर्व सहज उपलब्ध होते आहे. अनुदान भरपूर प्रमाणात मिळते आहे. त्यांच्या मालाला हमीभाव मिळतो आहे.
अनेक शेतकरी आपला माल थेट निर्यात करू लागले आहेत. इतर देशांची भूक आपण मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा करून भागवत आहोत. जे की त्यांचे जीवनात सुगीचे दिवस खऱ्या अर्थाने आणणारे ठरले आहे. आता ग्राम परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने मोदींचे हेच काम कृषी खात्याच्या योजना प्रकल्प आणि संकल्प सामान्य शेतकरी वर्गापर्यंत घेऊन जायचे आहेत ते सर्वानी योग्य पद्धतीने करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
देश पातळीवर या योजनेचा शुभारंभ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथे झाला त्यावेळी यु पी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हा लाईव्ह कार्यक्रम हाय टेक यंत्रणेद्वारे एल ई डी वॉल वर निंबळक येथील निसर्ग सृष्टी गो पालन संस्थेत प्रत्यक्ष एल ई डी वॉल वर दाखवला.
त्यानंतर या यात्रेचा शुभारंभ करताना बळीराजा, बलराम, गोमाता आणि नांगर यांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल आगळे यांनी केले. तर भाजपा किसान मोर्चाचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष झाल्याबद्दल दिलीप भलसिंग यांनी व निंबळकर ग्रामपंचातीच्या वतीने नितीन उदमले यांचा सत्कार केला. तसेच रमेश पिंपळे यांनी सर्वांचे आभार मानले.