Nitin Gadkari : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) म्हणाले की, सन 2024 पूर्वी देशात 26 हरित द्रुतगती मार्ग तयार होतील आणि रस्त्यांच्या बाबतीत भारत (India) अमेरिकेच्या (America) बरोबरीने असेल. यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Jio ची भन्नाट ऑफर… 3 महिन्यांचा प्लॅन 150 रुपयांनी स्वस्त, आजच करा रिचार्ज नाहीतर https://t.co/SEz3jYL1LL
— Krushirang (@krushirang) August 3, 2022
केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती
नितीन गडकरी म्हणाले की, टोल वसूल करण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. पहिला पर्याय गाड्यांमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्याशी संबंधित आहे तर दुसरा पर्याय आधुनिक नंबर प्लेट्सशी संबंधित आहे. ते म्हणाले की, काही काळापासून नवीन नंबर प्लेटवर भर दिला जात आहे. आणि पुढील एका महिन्यात एक पर्याय निवडला जाणे अपेक्षित आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यावर टोल नाक्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतुकीवरही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.
भारताचे रस्ते अमेरिकेसारखे असतील
वास्तविक, नितीन गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तरे देताना ही माहिती दिली. ते म्हणाले की 2024 पूर्वी देशात 26 ग्रीन एक्स्प्रेसवे सुरू केले जातील, ज्यामुळे भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. त्यांनी सांगितले की, रस्त्यांच्या निर्मितीमुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल.
Hackers : सावधान.. हॅकर्सचा स्मार्टफोनवर हल्ला; पटकन delete करा हे 13 Apps नाहीतर होणार.. https://t.co/ItSfTPG3US
— Krushirang (@krushirang) August 3, 2022
आता काय नियम आहे?
नितीन गडकरी म्हणाले की, सध्या एखाद्या व्यक्तीने टोल रस्त्यावर 10 किमीचे अंतरही कापले तर त्याला 75 किमीचे शुल्क भरावे लागते, परंतु नवीन प्रणालीमध्ये फक्त अंतर कापण्यासाठी शुल्क आकारले जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आर्थिक संकटातून जात असल्याचे त्यांनी नाकारले. ते म्हणाले की NHAI ची स्थिती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यात पैशांची कमतरता नाही. ते म्हणाले की, यापूर्वी दोन बँकांनी कमी दराने कर्ज दिले होते.