Nissan Magnite Facelift । टाटा पंचला टक्कर देईल ही तगडी फीचर्स असणारी कार, ‘या’ दिवशी होईल लाँच

Nissan Magnite Facelift । भारतीय बाजारात लवकरच Nissan Magnite Facelift लाँच होणार आहे. कंपनीची ही कार टाटा पंचला टक्कर देईल, यात कंपनीकडून शानदार फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.

निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट

काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली प्रीमियम एक्स-ट्रेल एसयूव्ही सादर केली होती जी लवकरच लॉन्च करण्यात येईल. एक्स-ट्रेलसह आपल्या नवीन योजना सादर करताना, निसानने सांगितले की, मॅग्नाइट फेसलिफ्टची फेसलिफ्ट आवृत्ती यावर्षी लॉन्च करण्यात येईल. नवीन मॅग्नाइट फेसलिफ्टच्या बाह्य लुकपासून, त्याचे आतील भाग अपडेट केले जातील. आकारात बदल होणार नसून लूक बदलण्यात येईल. पॉवर आणि मायलेज वाढवण्यासाठी नवीन मॉडेलचे इंजिन अपडेट करण्यात येईल.

मिळतील ही फीचर्स

  • नवीन डॅशबोर्ड
  • हवेशीर जागा
  • सॉफ्ट-टच डोअर पॅनेल
  • 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • सिंगल-पॅन सनरूफ
  • हवामान नियंत्रण
  • कीलेस एंट्री
  • निसान कनेक्ट टेलिमॅटिक्स

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर निसान मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये 1.0L, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करेल आणखी 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे 99bhp पॉवर आणि 160Nm जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड AMT आणि CVT गिअरबॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन मॉडेलची किंमत सुमारे 6 लाख रुपये असेल.

मॅग्नाइटची GEZA आवृत्ती

अलीकडेच निसानने GEZA CVT गिअरबॉक्ससह मॅग्नाइट बाजारात आणण्यात येईल. किमतीचा विचार केला तर कारची एक्स-शोरूम किंमत 9.84 लाख रुपये आहे. या नवीन मॉडेलमध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश केला असून यात CVT गिअरबॉक्स व्यतिरिक्त, यामध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले नाहीत.

Leave a Comment