Nilesh Lanke : राज्यात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यामुळे अनेकदा राज्याचे राजकीय वातावरण पेटत आहे. अशातच आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निलेश लंकेची खासदारकी धोक्यात आली आहे.
अहमदनगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. या दाखल केलेल्या याचिकेत काही मतदान केंद्रावरील मोजणीवर आक्षेप घेतला आहे. ४० ते ४५ केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाली नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मतदान केंद्रावरील मतदानाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केली आहे.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे ही खोटी आणि बदनामी करणारी आहेत. नीलेश लंके यांनी निवडणुकीत दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवला नसून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटील यांची खोटी बदनामी करणारी आहेत.
शिवाय मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवला नाही. लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करत डॉ. सुजय विखे पाटाली यांनी याचिका दाखल केली आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे पुढे खंडपीठानेही याचिका दाखल करून घेतली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मॅक पोलसाठी 40 लाख रुपये शुल्क भरले होते. विखे यांनी 40 मतदान केंद्रावर मॅक पोल करण्याची मागणी केली होती. निकालाच्या ४५ दिवसांनी आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता काहीतरी मोठे घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.