Sujay Vikhe : फाडफाड इंग्रजीचं चॅलेंज! लंके अन् रोहित पवारांचं विखेंना तिखट प्रत्युत्तर

Nilesh Lanke replies BJP MP Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे (Nilesh Lanke replies BJP MP Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात (Nilesh Lanke) जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी निलेश लंकेंना खोचक चॅलेंज दिले होते. त्यांच्या चॅलेंजला लंके यांनीही तितक्याच खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. सुजय विखे यांनी या मेळाव्यात भाषणा दरम्यान सांगितले होते, की मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. आता विखे यांच्या या चॅलेंजला उत्तर देणार नाहीत असे निलेश लंके यांच्याकडून होणार नाही. निलेश लंके यांनीही विखेंना सणसणीत प्रत्युत्तर दिले.

लंके म्हणाले, सुजय विखे श्रीमंत कुटुंबातील आहेत. ते माझ्यासारख्या गरी उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील. ही पैशांची मस्ती आहे. समोरच्या उमेदवाराकडे असलेल्या पैशांची मस्ती आहे. एका बाजूला म्हणायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की निलेश लंकेा इंग्रजी सुद्धा बोलता येत नाही. मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे इंग्रजीत शिक्षण घेऊ शकलो नाही, असे प्रत्युत्तर निलेश लंके यांनी सुजय विखेंना दिले.

Ahmednagar Lok Sabha : लंकेंविरोधात विखे-शिंदे एकत्र; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ खास मेसेज

Nilesh Lanke replies BJP MP Sujay Vikhe

रोहित पवारही चिडले

सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही (Rohit Pawar) संताप व्यक्त केला. रोहित पवार यांनी एक ट्विट करत सुजय विखे यांना खरमरीत उत्तर दिले. लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही, अशी टीका रोहित पवार यांनी या ट्विटमधून सुजय विखे यांच्यावर केली.

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके टफ फाईट

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत अखेर निश्चित झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, महाविकास आघाडी मात्र तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. परंतु, येथे उमेदवार काही मिळत नव्हता. निलेश लंके यांचेही तळ्यात मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी काल सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता नगर दक्षिण मतदारसंघात लंके सुजय विखेंना टफ फाईट देतील अशी चिन्हे आहेत.

Ahmednagar Lok Sabha : आता निलेश लंके मैदानात! जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात

Leave a Comment