Nilesh Lanke : लंकेंना थोरातांची साथ; तिकीट मिळताच संगमनेरात घेतली भेट, चर्चा काय?

Nilesh Lanke : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Nilesh Lanke) नेत्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत तर काही ठिकाणी मात्र जागांचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच काल महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

विशेष म्हणजे, निलेश लंके यांनी एक दिवस आधीच आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीनंतर नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात लढत निश्चित झाली आहे.

Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचे शिलेदार ठरले; तुतारी हाती घेताच लंकेंना तिकीटही मिळालं

Nilesh Lanke

उमेदवारी मिळाल्यानंतर निलेश लंके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काल लंके यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची संगमनेरमध्ये जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहणार आहोत अशी ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात यांचे नेहमीच मार्गदर्शन मला मिळत असते. विधानसभेमध्ये असताना देखील माझ्यासारख्या नवख्या आमदाराला त्यांनी सतत सहकार्य केले. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना भेटून आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने मी संगमनेरला गेलो होतो. यावेळी थोरात यांनी देखील लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दिल्याचे लंके म्हणाले.

नगरमध्ये विखे विरुद्ध लंके टफ फाईट

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत अखेर निश्चित झाली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, महाविकास आघाडी मात्र तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. परंतु, येथे उमेदवार काही मिळत नव्हता. निलेश लंके यांचेही तळ्यात मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी काल सुपा येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता नगर दक्षिण मतदारसंघात लंके सुजय विखेंना टफ फाईट देतील अशी चिन्हे आहेत.

Lok Sabha Elections : शिवसेना विरुद्ध शिवसेना! ‘या’ 5 मतदारसंघात शिंदे अन् ठाकरेंचे शिलेदार आमनेसामने

1 thought on “Nilesh Lanke : लंकेंना थोरातांची साथ; तिकीट मिळताच संगमनेरात घेतली भेट, चर्चा काय?”

Leave a Comment