मुंबई – बजाज कंपनीची पल्सर (Bajaj Pulsar) ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. कंपनीने आतापर्यंत 12 दशलक्षाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. यामुळेच या दुचाकीचे नवीन मॉडेल्स सातत्याने लाँच होत आहेत. आता कंपनी पुढच्या जनरेशनची Pulsar NS160 लवकरच लाँच करू शकते. या दुचाकीचे काही फोटो समोर आले आहेत. सध्याच्या पल्सरचे हे अपग्रेड मॉडेल असेल. पहिल्या दृष्टीक्षेपात, जे फोटो समोर आले आहेत ते जुन्या मॉडेलपेक्षा वेगळे दिसत नाहीत, परंतु निरीक्षण केल्यास फरक स्पष्टपणे दिसून येतो. नवीन Pulsar N250 मध्ये काय मिळेल ते जाणून घेऊ या..
पुढच्या पिढीतील पल्सर N250 हे सध्याच्या मॉडेलपेक्षा स्टाइलच्या बाबतीत खूप वेगळे आहे. यामध्ये किक-स्टार्टर देखील आहे, जे यापुढे दुचाकीच्या या विभागात दिसणार नाही. इतर फरकांमध्ये सध्याच्या 250cc पल्सर ट्विन्सच्या तुलनेत पातळ टायर्ससह लहान डिस्क ब्रेक (Disk Break) समाविष्ट आहेत. बजाज 160cc इंजिनच्या ट्यूनिंगमध्ये सुधारणा करून त्याची कार्यक्षमता वाढ करण्याची शक्यता आहे. या छोट्या बदलांसह, हे Pulsar NS160 कुटुंबातील मोठ्या सदस्यासारखे दिसते.
बजाज पल्सर 160NS च्या सध्याच्या मॉडेलमध्ये 160CC एअर कूल्ड इंजिन आहे. हे 15.6bHP पॉवर जनरेट करते. त्याची कमाल टॉर्क 14.6 न्यूटन मीटर आहे. यात 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याच्या समोर टेलिस्कोपिक देण्यात आले आहेत तर मागील बाजूस मोनोशॉक देण्यात आले आहेत. यात सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. सुरक्षेसाठी एबीएस (Anti Lock Breaking System) देखील देण्यात आली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत नवीन मॉडेल जास्त किंमतीत लाँच केले जाऊ शकते. हे Hero Xtreme 160R, TVS Apache RTR 160 4V आणि Suzuki Gixxer बरोबर स्पर्धा करेल.
इलेक्ट्रिक कंपन्यांचे टेन्शन वाढले..! ‘या’ 20 शहरांत आलीय ‘बजाज चेतक’; पहा, दमदार फिचर आणि किंमत..