New Smartphone Buying Tips : नवीन मोबाईल फोन खरेदी करायचा विचार करताय पण (New Smartphone Buying Tips) कोणता फोन खरेदी करायचा हेच लक्षात येत नाही. तर काळजी करू नका आम्ही आज तुम्हाला अशा काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट स्मार्टफोन खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी तुम्ही या दहा गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा.
बजेट
सगळ्यात आधी तुमच्या बजेटचा विचार करा. मार्केटमध्ये हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत विविध प्रकारचे आणि कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा विचार करून स्मार्टफोन खरेदी करा.
गरज
तुमच्या गरजा काय आहेत याचा सुद्धा विचार करा. तुम्ही जो फोन खरेदी करणार आहेत तो कोणत्या कामांसाठी वापरणार आहात याचा विचार करा. म्हणजे जसे गेमिंग, फोटोग्राफी, सोशल मीडिया किंवा अन्य काही कामासाठी. तुमच्या गरजेनुसार स्मार्टफोनची निवड करा.
Side Effects of Smart Phone Use | सावधान..! मोबाइलचा अतिवापर धोकादायकच; ‘या’ समस्या करतील हैराण
New Smartphone
ब्रँड
मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे आणि विवध ब्रँडचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचा विश्वास आणि हिशोबानुसार नक्की करा की तुम्हाला कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे.
स्पेसिफिकेशन्स
नवा स्मार्टफोन खरेदी करतेवेळी तुम्हाला ज्या गोष्टीचा आधी विचार करावा लागेल ते म्हणजे स्पेसिफिकेशन्स. मोबाईलचा प्रोसेसरद्वारेच स्मार्टफोनचा स्पीड आणि परफॉर्मन्स या गोष्टी निश्चित होतात. फोनचा स्टोअरेज माहिती, मेसेज स्टोअर करण्यासाठी उपयुक्त आहे. कॅमेरा चांगल्या दर्जाचा असणे सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे नवा स्मार्टफोन खरेदी करताना त्यात काय स्पेसिफिकेशन्स आहेत याची आधी माहिती घ्या.
रिव्यू
स्मार्टफोन खरेदी करण्याआधी त्याचे रीव्यू आधी माहिती करून घ्या. याद्वारे तुम्हाला त्या स्मार्टफोनबद्दल अधिक चांगली माहिती मिळेल. तसेच बाकी लोकांना काय अनुभव आला आहे याचीही माहिती तुम्हाला घेता येईल.
Smartphone Offer : स्वस्तात खरेदी करा iPhone 15 आणि Galaxy S23 Ultra, या ठिकाणी मिळतेय संधी
New Smartphone
ऑफर
आताच्या ऑनलाइनच्या जमान्यात मोबाईल फोन ऑनलाइन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. विविध ई कॉमर्स कंपन्या ऑनलाइन मोबाईल खरेदीवर चांगल्या ऑफर सुद्धा देत आहेत. ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे आधी काय ऑफर आणि डिस्काउंट स्कीम सुरू आहे याची माहिती घ्या.
वॉरंटी
स्मार्टफोन खरेदी करताना आधी त्या फोनची वॉरंटी किती दिवसांची आहे याची माहिती घ्या. काही कंपन्या मोबाईल खरेदीवर दोन वर्षांपर्यंत किंवा काही वेळेस जास्तीची वॉरंटी देखील देतात. तेव्हा या गोष्टीचाही स्मार्टफोन खरेदी करताना नक्की विचार करा.
टेस्ट
तुम्ही एखाद्या जवळच्या मोबाईल स्टोअरवर जाऊन तुम्हाला जो स्मार्टफोन खरेदी करायचा आहे त्याची टेस्ट घेऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला त्या स्मार्टफोनबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. तसेच मोबाईलमध्ये काही खराबी तर नाही ना हे सुद्धा कळेल.
Upcoming Smartphone : नवीन स्मार्टफोन घ्यायचाय? मग, फक्त 4 दिवस थांबा; ‘हे’ दमदार फोन येताहेत
डाटा ट्रान्स्फर
नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी तुमच्याकडील जुन्या फोनमधील डाटा नव्या फोनमध्ये ट्रान्स्फर करून घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमचा महत्वाचा डाटा सुरक्षित ठेवता येईल.
अपडेट्स
यानंतर या गोष्टीची देखील माहिती घ्या की तुम्ही खरेदी केलेल्या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून किती वर्षांपर्यंत अपडेट्स येत राहतील. स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी व्हायरस आणी अँटी थेफ्ट ॲप स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करून घ्याच.