New Rules । लवकरच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर आर्थिक ताण येऊ शकतो. कारण 1 ऑगस्टपासून काही नियमात बदल होणार आहेत. हे नियम कोणते आहेत? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
उपयुक्तता व्यवहार नियम
मागील महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे उशिरा पेमेंट, वीजबिल, भाडे आणि इतर उपयुक्तता व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल केले होते. नियमानुसार, महाविद्यालय किंवा शाळेच्या वेबसाइटद्वारे थेट पैसे भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. समजा तुम्ही MobiKwik, CRED इत्यादी थर्ड पार्टी ॲप्स वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावे लागेल. प्रति व्यवहार मर्यादा 3000 रुपये असून थर्ड ॲप्सद्वारे 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरले तर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर
१ ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होईल. दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्या बदल करतात, मागील महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती. यावेळी सिलिंडरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
HDFC बँक क्रेडिट कार्ड नियम
पुढच्या महिन्यापासून HDFC बँकेकडून Tata New Infinity आणि Tata New Plus क्रेडिट कार्ड्समध्ये बदल केले जात असून या कार्डधारकांना टाटा न्यू यूपीआय आयडी वापरून व्यवहारांवर 1.5% नवीन नाणी मिळतील.
Google नकाशे नियम
गुगल मॅपने केलेल्या नियमातील बदल १ ऑगस्टपासून लागू होणार असून कंपनीकडून भारतातील आपल्या सेवांचे शुल्क 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. Google Maps या सेवेसाठी डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारेल.
EMI प्रक्रिया शुल्क
हे लक्षात घ्या की उशीरा पेमेंट टाळण्यासाठी सुलभ हप्ते उपलब्ध आहेत. पण यासाठी २९९ रुपयांपर्यंतचा ईएमआय प्रोसेसिंग चार्ज भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेच्या मतानुसार, हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही या बँकेतूनही थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 1 टक्के शुल्क भरावे लागेल.