New Rules । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. अशातच आता आजही म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला नियमात बदल झाले आहेत. फास्टॅग नियम ते LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या आहेत, जाणून घ्या.
सोशल मीडिया
आजपासून सोशल मीडियाचे नियमही बदलले असून भारत सरकारने आयटी नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, X, Facebook, YouTube आणि Instagram या सोशल मीडियावर जर कोणी चुकीची तथ्ये किंवा चुकीच्या बातम्या पोस्ट करत असल्यास तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्याला मोठा दंडही भरावा लागेल.
एलपीजी सिलेंडर
हे लक्षात घ्या की महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल होत असतो. आज व्यावसायिक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी वाढले असून हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. अशातच आता दिल्लीत 9 किलोचा गॅस सिलिंडर 1,769.50 रुपयांना मिळेल. फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत 1769.50 रुपये होती. पण घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 903 रुपये इतकी आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मे २०२२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या किमतीत बदल झाला. पण आजही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. करांमुळे अनेक शहरांमध्ये त्यांचे दर वेगवेगळे असतात.
बँक सुट्टी
RBI ने मार्च महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली असून या महिन्यात शिवरात्री, होळी, गुड फ्रायडे अशा अनेक प्रसंगी बँका बंद राहणार आहेत, याची नोंद घ्या. रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारीही बँक बंद राहणार असल्या तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सेवा मिळणार आहे.
जीएसटी नियम
1 मार्च 2024 पासून, 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांना सर्व B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस तपशील प्रदान करावा लागणार आहे. जर त्याने माहिती दिली नाही तर तो ई-वे बिल जारी करू शकणार नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीनुसार, 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंसाठी ई-वे बिल गरजेचे आहे, हे लक्षात घ्या.
पेटीएम पेमेंट बँक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बंदीची अंतिम मुदत 15 मार्च 2024 असून अशा परिस्थितीत ग्राहकाने पेटीएम पेमेंट्स बँकेत असणारी रक्कम १५ मार्चपूर्वी दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करावी, असा सल्ला आरबीआयकडून देण्यात आला आहे.
फास्टॅग केवायसी
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग केवायसी अपडेट अनिवार्य केले असून त्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी 2024 होती. फास्टॅग केवायसी अपडेट केले नाही तर फास्टॅग काळ्या यादीत किंवा निष्क्रिय करण्यात येईल.