New Rules : काही दिवसात जुन महिना सुरू होणार आहे यामुळे आता देशात देखील काही नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. चला मग जाणुन घ्या 1 जूनपासून देशात बदलणाऱ्या 3 मोठे नियमांबाबत संपूर्ण माहिती.
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती बदलू शकतात
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात करण्यात आली. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत जूनमध्ये सिलिंडरच्या दरात बदल होतो की नाही हेही पाहावे लागेल.
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच
इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार
1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार आहे. 21 मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक दुचाकीवरील सबसिडी कमी केली आहे. यापूर्वी ही सबसिडी 15 हजार रुपये प्रति किलोवॅट तास होती, ती कमी करून 10 हजार रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आली आहे. यामुळे जूनमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करण्यासाठी 25-30 हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
1 जूनपासून बँका लोकांचे पैसे शोधून परत करतील
रिझर्व्ह बँकेने बँकांमध्ये पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींचे वारस शोधण्याची मोहीम जाहीर केली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 100 दिवसांच्या आत सर्वोच्च 100 लावलेल्या ठेवी शोधून त्यांचा निपटारा करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ‘100 दिवस 100 पे’ मोहीम जाहीर केली आहे. ही मोहीम 1 जूनपासून सुरू होणार आहे.