सप्टेंबर महिना दिलासा देणारा ठरत आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस दरात मोठी कपात केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे. विमान इंधनाचे (ATF) नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, आता नवी दिल्लीत एटीएफची किंमत 1201041.44 रुपये प्रति किलो, तर कोलकात्यात 127523.33, मुंबई 12001.74 आणि चेन्नईमध्ये 125599.88 रुपये प्रति किलोलीटर आहे. हे दिल्लीतील विक्रमी उच्चांकापेक्षा 20191.43 रुपये प्रति किलो लिटरने स्वस्त आहे. विमानाचे इंधन स्वस्त झाल्याने भविष्यात विमान प्रवासाचे तिकीटाचे दरही कमी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

जून महिन्यात त्याची किंमत 1,41,232.87 रुपये प्रति किलोलीटर (141.23 रुपये प्रति लिटर) च्या शिखरावर पोहोचली होती. ATF च्या किमती दर महिन्‍याच्या 1 आणि 16 तारखेला आंतरराष्‍ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे सुधारित केल्या जातात. यापूर्वी 1 जुलै रोजी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल कर 13.5 रुपये प्रति लीटर केला आहे, तर विमानाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या एटीएफ (Aviation Turbine Fuel) च्या निर्यातीवर तो 9 रुपये प्रति लिटर केला आहे. देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील (Crude Oil) शुल्कही वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयाने बुधवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली.

अधिसूचनेनुसार, चौथ्या पंधरवड्याच्या आढाव्यात, सरकारने डिझेलच्या (Diesel) निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) 7 रुपयांवरून 13.5 रुपये प्रति लिटर, तर एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) च्या निर्यातीवर 2 रुपयांनी वाढवला आहे. सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील शुल्क 13000 रुपये प्रति टन 300 रुपयांनी वाढवून 13,300 रुपये केले आहे. भारताने 1 जुलै रोजी पहिल्यांदा विंडफॉल नफा कर लागू केला होता. यासह, ऊर्जा कंपन्यांच्या प्रचंड नफ्यावर अतिरिक्त कर लावणाऱ्या देशांपैकी एक बनला.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version