New Parliament Building : संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) 28 मे रोजी होणार आहे. तयारी पूर्ण झाली असली तरी या मुद्द्यावर राजकारण मात्र तापले आहे. 28 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमावर काँग्रेससह सुमारे 20 पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाही, अशी त्यांची मागणी आहे. विरोध असूनही नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांची यादी वाढत चालली आहे. आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात 25 पक्ष सहभागी होणार आहेत.
यामध्ये भाजपसह इतर 24 पक्ष सहभागी होणार आहेत. बहिष्कार घालणाऱ्या पक्षांनी सांगितले की, या सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या आत्म्यावर वारंवार हल्ला झाला. राष्ट्रपतींना या महत्त्वाच्या कार्यापासून दूर ठेवणे हे बरोबर नाही.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला फार दिवस उरलेले नाहीत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून देशातील राजकीय पक्षांमध्ये फूट पडली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेससह सुमारे 20 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. असे असतानाही नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणाऱ्यांची यादी वाढत आहे. विरोधकांच्या एकजुटीवर हे संकट आहे.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना (शिंदे गट), नॅशनल पीपल्स पार्टी मेघालय, नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, सिक्कीम क्रांती मोर्चा, जन नायक पक्ष, एआयएडीएके, आयएमकेएमके, एजेएसयु, आरपीआय (आठवले गट), मिझो नॅशनल फ्रंट, तामिळ मनिला काँग्रेस, आयटीएफटी, बोडो पीपल्स पार्टी, पट्टाली मक्कल काची, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अपना दल, आसाम गण परिषद, लोक जनशक्ती पार्टी (पासवान), बीजेडी, बसपा, टीडीपी, वायएसआरसीपी, शिरोमणी अकाली दल आणि जेडीएस या पक्षांचा समावेश आहे.
सहभागी पक्षांपैकी 18 पक्ष एनडीएचे घटक आहेत, तर 7 गैर-एनडीए घटक देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.
गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले की, नवीन संसद भवनात राजदंड बसवला जाईल. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सत्तेच्या हस्तांतरणाचे ते प्रतीक आहे. ही परंपरा चोल राजघराण्यापासून चालत आली होती. त्याचे नाव सेंगोल असे दिले आहे.