New Maruti Dzire : भारतात लवकरच लाँच होणार नवीन मारुती डिझायर, जबरदस्त मायलेजसह किंमत असेल…

New Maruti Dzire : कारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात नवीन मारुती डिझायर पुढील महिन्यात लाँच होणार होणार आहे. नवीन मारुती डिझायरमध्ये जबरदस्त मायलेज आणि फीचर्स मिळेल. जाणून घ्या अधिक माहिती.

मिळेल जबरदस्त इंजिन

मारुती आपले नवीन Z-Series 3 सिलिंडर इंजिन नवीन Dezire मध्ये स्थापित करेल, हे लक्षात घ्या. नवीन कारचे हे इंजिन नवीन स्विफ्टला देखील उर्जा देते. हे 1.2 लीटर इंजिन 82 एचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज असून या नवीन डिझायरमध्ये पॉवर आणि टॉर्कमध्ये किरकोळ बदल केले जाण्याची शक्यता आहे,असे मानले जात आहे. कंपनीने असे सांगितले की नवीन इंजिन 14% जास्त मायलेज देते.

जाणून घ्या 3 सिलेंडर इंजिनचे फायदे

आजकाल, अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या नवीन कारमध्ये 4 सिलेंडर इंजिनऐवजी 3 सिलेंडर इंजिन वापरण्यास सुरुवात केली असून त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार चालवत असताना जास्त शक्ती प्रदान करते. एक सिलेंडर कमी केले तर इंजिनचा आकार लहान होतो आणि खर्च देखील कमी होतो, ज्यामुळे कारची किंमत देखील थोडी कमी होते. इतकेच नाही तर उत्तम मायलेजही मिळतो.

मिळेल सीएनजीचा पर्याय

नवीन डिझायरमध्ये पेट्रोल आणि सीएनजीचे पर्याय उपलब्ध असतील. सूत्रांच्या माहितीनुसार ही कार 25kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. तर CNG मोडवर त्याचे मायलेज 31km च्या पुढे जमायची शक्यता आहे. नवीन Dezire मध्ये 378 लीटरची मोठी बूट स्पेस असणार आहे.

नवीन स्विफ्टची एक झलक तिच्या समोर आणि आतील भागात पाहिली जाईल. किमतीचा विचार केला तर असे सांगण्यात येत आहे की नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या मॉडेल पेक्षा थोडी जास्त असू शकते. सध्या, सध्याच्या Dezire ची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment