New Car Buying Tips : एकदा तुम्हाला तुमच्या गरजा समजल्या की मग (New Car Buying Tips) तुमचे बजेट ठरवता येते. जर तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला आवडत असलेल्या वाहनात भरपूर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत याची खात्री करून घ्या. त्याच वेळी जेव्हा तुम्ही नवीन कारबद्दल त्याच्या किंमतीनुसार जाणून घेण्यासाठी जात असाल तेव्हा सुरक्षा रेटिंगसह अन्य महत्वाच्या गोष्टींची खात्री करून घ्या.
जर तुम्ही याआधी कधीही कार खरेदी केली नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. कारण या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा स्ट्रॅटेजींबद्दल सांगणार आहोत ज्या पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
रिसर्च
नवीन कार घेण्यापूर्वी हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रथम आपल्या घरच्या गरजेनुसार कार खरेदी करा. तुमचे कुटुंब मोठे असल्यास ज्यामध्ये 5 पेक्षा जास्त लोक राहतात तर तुम्ही 7 सीटर कारकडे जावे. जर तुमच्या कुटुंबाची संख्या 5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही 5 सीटर कारकडे जाऊ शकता. आता कोणती कार घ्यायची हा प्रश्न येतो, मग तुम्ही स्वतः रिसर्च करा आणि तुम्हाला चांगली वाटेल तीच कार घ्या.
किंमत
एकदा तुम्हाला तुमच्या गरजा समजल्या की मग तुमचे बजेट ठरवा. जर तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला आवडत असलेल्या वाहनात भरपूर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत याची खात्री करून घ्या. त्याच वेळी जेव्हा तुम्ही नवीन कारबद्दल त्याच्या किंमतीनुसार जाणून घेण्यासाठी जाल, तेव्हा सुरक्षा रेटिंग या गोष्टी देखील शोधा.
डॉक्यूमेंटेशन
एकदा तुम्ही कार फायनल केल्यावर तुम्हाला काही कागदपत्रे जसे की आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ कार खरेदी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करा. अन्यथा वित्तपुरवठा करताना किंवा वाहनाची नोंदणी करताना अडचणी येतील.
फायनान्स
तुम्हाला तुमच्या नवीन कारसाठी वित्तपुरवठा करायचा असल्यास फायनान्स कंपनी किंवा बँक निवडण्यापूर्वी व्याजदर आणि अटींची तुलना करा. जर तुम्ही कर्जावर नवीन कार (Car Loan) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याबद्दल तुमच्या बँकेशी बोलणे आवश्यक आहे, जेणेकरून वित्तपुरवठा करताना कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय कमी व्याजाच्या पॅकेजबद्दल निश्चितपणे विचारा जेणेकरून नवीन कार खरेदी करताना आकारले जाणारे व्याजदर कमी करता येतील.