मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) आज राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra budget 2022-23) करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विमान वाहतुकीसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
विमान वाहतुकीसाठी ज्या घोषणा केल्या आहेत, त्यामध्ये नागपूर, शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळांचा समावेश आहे. शिर्डी विमानतळावरुन मालवाहतुकीसाठी तसेच सायंकाळच्या वाहतुकीसाठी जवळपास 150 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळासाठी भू संपादनाचे काम सुरू आहे, तसेच गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भू संपादनासाठी 100 कोटी रुपये तरतूद केली आहे, राज्यातील उद्योगांचा विस्तार करण्यासाठी विमानतळ उभारणी आणि विमानतळांचा विस्तार फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करुन काही दिलासा दिला होता. मात्र, राज्य सरकारने तसा कोणताच निर्णय घेतला नाही. व्हॅट सुद्धा कमी केला नाही. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात इंधनासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. यानंतर आजच्या अर्थसंकल्पात या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, सरकारने तसा कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.
मात्र, नैसर्गिक वायू वापरात वाढ होण्यासाठी घरगुती पाइप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहनांचा वापर वाढावा, यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मूल्यवर्धित कराचा दर (व्हॅट) 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे 800 कोटी रुपये घट होणार आहे. या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार आहे.
Maharashtra Budget Live : सर्वसामान्यांना दिलासा..! CNG बाबत राज्य सरकारने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय..
Maharashtra Budget 2022 : राज्यातील उद्योगासाठी सरकारची मोठी घोषणा; पहा, काय मिळणार..?