Corona : देशात एका दिवसात तब्बल 21 हजार 880 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची (Corona Virus Patient) संख्या 4,38,47,065 वर पोहोचली असून त्यापैकी 1,49,482 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) शुक्रवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 60 जणांचा मृत्यू झाला असून, देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या 5,25,930 झाली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की एकूण संसर्गापैकी 0.34 टक्के अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. देशात कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.46 टक्के आहे. आकडेवारीनुसार, 24 तासांच्या कालावधीत कोविड-19 च्या 601 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
High Blood Pressure मुळे ‘या’ आजारांचा धोका; आजच करा BP नियंत्रित नाहीतर.. https://t.co/BeR02cr7io
— Krushirang (@krushirang) July 22, 2022
कोविड-19 प्रकरणांचा तक्ता जाहीर करताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख प्रकरणे, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख प्रकरणे, 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाख प्रकरणे, 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख प्रकरणे. त्याचप्रमाणे 28 सप्टेंबर 2020 रोजी कोविडची 60 लाख प्रकरणे, देशात कोरोनाने 19 डिसेंबर 2020 रोजी 1 कोटीचा टप्पा गाठला, गेल्या वर्षी 4 मे रोजी 2 कोटींचा टप्पा गाठला. या वर्षी जानेवारीमध्ये कोरोनाने 4 कोटींचा टप्पा पार केला होता, त्यामुळे आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,38,47,065 झाली आहे.
Diabetic Patients : वयाच्या 45 व्या वर्षांनंतर या कारणांमुळे मधुमेहाच्या रुग्णांना येतो हृदयविकाराचा झटका https://t.co/7EEZU1FbTL
— Krushirang (@krushirang) July 22, 2022
गेल्या दोन वर्षांपासून हा घातक आजार जगात थैमान घालत आहे. अजूनही हा आजार कायम आहे. काही देशांत रुग्णवाढ सुरुच आहे. या आजाराबरोबरच आणखीही काही आजारांनी लोकांना हैराण केले आहे. सध्या तर कोरोनाचे काही नवे व्हेरिएंटही येत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे सतर्क आहेत. देशातील कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मास्कचा (Mask) तर सर्वांनाच विसर पडला आहे. सोशल डिस्टन्सचा (Social Distance) नियम तर कुणीच पाळत नाही. लसीकरणाचेही (Covid Vaccination) प्रमाण कमी होत आहे. बुस्टर डोस घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत, त्यामुळे हा आजार फैलावण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या काही कारणांमुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.