Netflix । आता इंटरनेटशिवाय वापरता येईल नेटफ्लिक्स, कसे ते जाणून घ्या….

Netflix । अलीकडच्या काळात नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नेटफ्लिक्सवर अनेक चित्रपट, वेबसिरीज असतात. तुम्ही ते कधीही आणि कोठेही पाहू शकता. पण आता तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्स वापरू शकता.

समजा तुम्ही प्रवास करत असाल किंवा इंटरनेट उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी असलात तरीही आता तुम्हाला नेटफ्लिक्सवर तुमच्या आवडीचे चित्रपट किंवा मालिका डाउनलोड करून पाहू शकता. नेटफ्लिक्सवरून कंटेंट कसा डाउनलोड करायचा ते जाणून घ्या

असे करा डाउनलोड

1. सर्वात अगोदर Netflix ॲप उघडा आणि तुम्हाला डाउनलोड करायचा असणारा चित्रपट किंवा वेब सीरिज निवडा.
2. चित्रपट किंवा वेब सिरीज चालू केल्यानंतर तुम्हाला खाली सरकणारा बाण दिसेल. हे चिन्ह सूचित करते की तुम्ही ते डाउनलोड करू शकता. जर हे चिन्ह दिसत नसल्यास तुम्हाला तो चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड करता येणार नाही.
3. डाउनलोड चिन्हावर क्लिक करून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाउनलोडची गुणवत्ता निवडू शकता, जसे की मानक किंवा उच्च.
4. यानंतर, तुम्ही नेटफ्लिक्स ॲपमधील ‘डाउनलोड’ विभागात जाऊन डाउनलोड प्रगती पाहावी लागेल. हे लक्षात ठेवा की डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन चांगले असावे लागते.
5. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यावर, तुम्ही नेटफ्लिक्स ॲपच्या ‘डाउनलोड’ विभागात जाऊन तुम्हाला डाउनलोड केलेले चित्रपट आणि वेब सीरिज पाहता येईल.

लक्षात ठेवा या गोष्टी

1. डाउनलोड केलेली सामग्री कायमस्वरूपी नसणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण Netflix काही काळानंतर ते काढून टाकते. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी आणि वेब सीरिजसाठी हा काळ वेगळा असेल. शक्यतो ते 2 दिवस ते 30 दिवसांपर्यंत असते.
2. तुम्ही तुमचे Netflix सदस्यत्व रद्द केले तर डाउनलोड केलेले चित्रपट आणि वेब सिरीज तुमच्या डिव्हाइसवरून काढून टाकण्यात येतील.
3. तुम्ही पुन्हा सदस्यत्व घेतले तर तुम्हाला ते पुन्हा डाउनलोड करावे लागतील.
4. एकदा तुम्ही डाउनलोड केलेली सामग्री पाहिल्यानंतर, तुम्ही जागा मोकळी करण्यासाठी ती डिव्हाइसवरून काढू शकता.
5. या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सिरीज कधीही, कुठेही पाहू शकता.

Leave a Comment