Nepal : नेपाळमध्ये चीनी पॉलिटिक्स! जुनी युती तोडली; PM प्रचंड ‘या’ चीन समर्थकाबरोबर करणार आघाडी

New Government Alliance in Nepal : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये पुन्हा राजकारण (New Government Alliance in Nepal) तापलं आहे. या देशात पुन्हा चीनी राजकारणाने एन्ट्री (Nepal Politics) घेतली आहे, ज्यामुळे आगामी काळात भारताची डोकेदुखी वाढणार आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल (प्रचंड) आणि (Pushpa Kamal Dahal) माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्यातील युती आता तुटली आहे. यानंतर दहल यांनी केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्याबरोबर आघाडी करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

केपी शर्मा ओली हे चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. याआधी पंतप्रधानपदी असताना केपी शर्मा ओली यांनी भारताला डोकेदुखी ठरणारे निर्णय घेतले होते. त्यांच्याच काळात नेपाळच्या राजकारणात चीनचा हस्तक्षेप वाढला होता आणि नेपाळ-भारत संबंधांत (India Nepal Tension) तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून केपी ओली आणि पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी अनेकवेळा चीनी राजदूतांची भेट घेतली होती.

Pakistan Presidential Election 2024 : पाकिस्तानात आता राष्ट्रपती निवडणूक; पहा, काय होतंय पॉलिटिक्स?

अर्थमंत्री सुरेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मंत्रिमंडळाचे नेते लवकरच शपथ घेऊ शकतात. पुष्पकमल दहल आणि शेर बहादूर यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. त्यामुळे 15 महिने जुनी युती तुटली आहे. ही युती तोडण्यात चीनचाही हात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांना दूर करण्यात चीनी राजदूताची मोठी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात चीनचा नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप वाढला आहे. चीनला नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे. नेपाळमध्ये शेर बहादूर देऊबा यांना भारत समर्थक मानले जाते. तर केपी ओली यांच्यावर चीनचा प्रभाव आहे. यामुळेच चीनच्या जिनपिंग सरकारला ओली यांना पुन्हा सत्तेत आणायचे आहे. या खेळीत चीनला काही प्रमाणात यश आले आहे.

China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?

नेपाळचे पंतप्रधान असताना केपी शर्मा ओली सातत्याने भारतविरोधात भूमिका घेत होते. त्यांच्याच काळात भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमावाद समोर आला होता. ओली चीनी समर्थक आहेत. चीनच्या राजदूताच्या इशाऱ्यावरून त्यांन एक वादग्रस्त नकाशा सादर केला होता. यामध्ये भारतातील काही भाग नेपाळच्या नकाशात दाखवण्यात आले होते.

Leave a Comment