Nepal Controversial Note | नेपाळचा भारताला धक्का! नव्या नोटा अन् नकाशाच्या निर्णयात कोणता प्लॅन?

Nepal Controversial Note Decision : चीनच्या दबावाखाली नेपाळचा आणखी एक कारनामा (Nepal Controversial Note Decision) समोर आला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने आज शंभर रुपयांच्या नवीन नोटा छापण्यास मंजुरी दिली. ज्यामध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे क्षेत्र नेपाळच्या नकाशात दाखवले जातील. हे प्रकरण खूप वादग्रस्त आहे कारण भारत लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणीवर आपला हक्क सांगतो आणि ऐतिहासिकदृष्ट्या ते भारताचा भाग आहेत.

नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. रेखा शर्मा म्हणाल्या की पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत शंभर रुपयांच्या नोटेसह नवीन नकाशा छापण्याचा निर्णय घेण्यात आला. लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे वादग्रस्त भाग या नोटांमध्ये दाखविण्यात येणार आहेत. रेखा शर्मा या नेपाळ सरकारमध्ये माहिती आणि दळणवळण मंत्री देखील आहेत. त्या म्हणाल्या की 25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने शंभर रुपयांच्या नोटेचे डिझाईन करण्यास आणि या नोटांवर छापलेला जुना नकाशा बदलण्यास मान्यता दिली आहे.

Nepal : नेपाळमध्ये चीनी पॉलिटिक्स! जुनी युती तोडली; PM प्रचंड ‘या’ चीन समर्थकाबरोबर करणार आघाडी

Nepal Controversial Note

दरम्यान, याआधी 18 जून 2020 रोजी नेपाळने आपल्या संविधानात बदल केला होता. यामध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणी या महत्त्वाच्या भागांचा समावेश करून देशाचा नकाशा अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यावेळी भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भारत सरकारने या प्रकाराला एकतर्फी कृत्य म्हणून संबोधले होते. भारताने नेपाळच्या प्रादेशिक दाव्याचा कृत्रिम विस्तार असे वर्णन केले होते. लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापाणीवर भारताचा हक्क आहे. ही तिन्ही क्षेत्रे ऐतिहासिकदृष्ट्या भारताकडे आहेत.

नेपाळ यावेळी भारताविरोधात अशी पावले उचलत आहे असे नाही. याआधीही असे प्रकार उद्भवले आहेत. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात सुद्धा हा वाद उभा राहिला होता. चीनने जेव्हापासून नेपाळमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून असे वाद वारंवार उद्भवत आहेत. नेपाळच्या राजकारणात चीनचा हस्तक्षेप वाढल्याने नेपाळकडून असे उद्योग सुरू झाले आहेत.

Nepal Controversial Note

China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा

Leave a Comment