Nepal Bus Accident मृतांचा आकडा 41 वर पोहोचला, महाराष्ट्रात आणले विशेष विमानाने 24 भारतीयांचे मृतदेह

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून नेपाळला निघालेली बस अचानक नेपाळच्या मार्सियांगडी नदीत कोसळल्याने हा अपघात घडला.या अपघात मृत्यू होणाऱ्या बहुतांश प्रवासी महाराष्ट्रातील असल्याचे समजते.

माहितीनुसार, ही बस 8 दिवसांच्या परमिटने 20 ऑगस्ट रोजी रुपंदेहीच्या बेल्हिया चेक-पॉईंटवरून नेपाळ सीमेवर दाखल झाली होती. 24 जणांचे मृतदेह नाशिकला आणण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाचा वापर करण्यात आला.

या घटनेबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मृत भारतीयांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती केली. केंद्र सरकारने यासंदर्भात विशेष अधिकारी नेमला आहे. सीएम शिंदे हे नेपाळच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सतत संपर्कात आहेत.

विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणण्यात आले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर 24 पर्यटकांचे मृतदेह नाशिकला आणण्यासाठी खास इंडियन एअर विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.

बस 500 फूट खोल दरीत कोसळली

नेपाळ सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 44 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 42 प्रवासी आणि एक चालक आणि कंडक्टर असल्याचे समजते. नेपाळ सरकारने पुढे सांगितले की, बस तनहुन जिल्ह्याजवळ महामार्गावरून 500 फूट खाली नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच नेपाळ प्रशासनाने बचावकार्य सुरू केले, त्यानंतर 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Leave a Comment