दिल्ली : लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. एका महिन्यात लिंबाचा भाव 70 रुपयांवरून 400 रुपयांवर गेला आहे. भाजी विक्रेते 1 लिंबू 10 रुपयांना देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्याची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलचे वाढते दरही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीतही 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
लिंबाच्या किमतीत वाढ झाल्याने घरांबरोबरच हॉटेलमधूनही लिंबू गायब झाले आहेत. हॉटेलमध्ये लिंबाचा वापर क्वचितच दिसून येतो. त्याचबरोबर उसाचा रस आणि भाज्यांमध्ये लिंबाचा वापर कमी प्रमाणात होत आहे. आजकाल सफरचंद, द्राक्षे आणि डाळिंबापेक्षा लिंबू जास्त किंमतीत विक्री होत आहे.
तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशभरातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे लिंबू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आवश्यकतेपेक्षा कमी उत्पादन झाले असून, त्यामुळे दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, त्याप्रमाणात उत्पादन नसल्याने बाजारपेठेत लिंबाचा पुरवठा कमी झाल आहे. आणि त्याचा परिणामम म्हणून लिंबाचे भाव वाढले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीचे शुल्कही वाढले आहे. त्याचा परिणाम लिंबासह सर्वच फळभाज्यांच्या दरावर दिसून येत आहे. लिंबाचा वापर शीतपेय तसेच अनेक औषधी आणि खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. शेतातून लिंबू थेट कारखान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सर्वसाधारण गरजेनुसार लिंबूही बाजारात पोहोचत नाही.
लिंबू, संत्रा व मोसंबी मार्केट अपडेट : पहा राज्यभरात कुठे मिळतोय सर्वाधिक भाव