Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे . आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भारत जोड न्याय यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल राहुल गांधी यांना आसाम पोलीस समन्स बजावणार असल्याची माहिती दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आसाम पोलिस राहुल गांधी यांना समन्स बजावणार आणि त्यांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल अशी माहिती हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिली आहे.
गुवाहाटीमध्ये एका अधिकृत कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सीएम सरमा म्हणाले, “जेव्हा कोणी कायदा मोडेल, तेव्हा साहजिकच समन्स जारी केले जातील. समन्स राहुल गांधींकडे जाईल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना येथे हजर व्हावे लागेल.”
जानेवारीमध्ये न्याय यात्रेदरम्यान हिंसाचार झाला होता
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आसाम कॉंग्रेस अध्यक्ष भूपेन कुमार बोरा तसेच काँग्रेस आमदार झाकीर हुसेन सिकंदर यांना बजावण्यात आलेल्या समन्स ही प्रक्रियेची सुरुवात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आसाम पोलिस राहुल गांधी यांना देखील या प्रकरणात समन्स बजावणार आहे.
याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच चौकशी केली आहे
सिकदार आणि पक्षाचे गुवाहाटी शहर सरचिटणीस रमेन कुमार सरमा यांना प्राथमिक नोटीस बजावण्यात आली असून या दोघांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. नंतर, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया आणि बोरा यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते दोघेही नियोजित तारखेला हजर झाले नाहीत. ”
जबरदस्त! ‘या’ लोकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये; फक्त करा ‘हे’ काम
आम्ही या दोघांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. सैकियाला 6 मार्चला आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, तर बोराला 7 मार्चला आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
तर दुसरीकडे येत्या काही दिवसात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आपल्या उमदेवारांची पहिली लिस्ट जारी करू शकते. या लिस्टमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा देखील नाव असण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. मात्र राहुल गांधी आगामी लोकसभा कोणत्या मतदारसंघातून लढवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.