NCP vs BJP । राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता विधानसभेपर्यंत महायुती टिकणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येऊ लागला आहे.
मावळचे भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना विरोध करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणाले की, “मावळ हा कालही आणि आजही भाजपचाच बालेकिल्ला असल्याने येत्या काळात आपल्याला इथून लढायचे आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जनतेने दाखवून दिले आहे की, कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय घेतले तर काय होते.
सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आमदार असून महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटू शकते. अशातच मागील वेळी पराभूत झालेले माजी मंत्री बाळा भेगडे यांची अडचण झाली आहे. मावळमधील भाजप नेत्यांनी प्रदेश भाजपकडे प्रस्ताव पाठवत ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी मागणी केली आहे. जर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली नाही तर यामुळे महायुतीला तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.