अहमदनगर : सध्या शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिर’ सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप होत आहे. त्यासाठी पवार येथे उपस्थित झाल्यावर कार्यकर्त्यांनी दणक्यात घोषणा देत त्यांच्या जेष्ठ नेत्याचे स्वागत केले. सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या ट्विटर खात्यावरून या शिबिराचे सर्व अपडेट प्रसिद्ध केले जात आहेत.
पवार साहेब आल्यावर एक व्हिडिओ शेअर करून पक्षाने याची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी सभागृहात प्रवेश करताच ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले होते की, आदरणीय शरद पवार साहेबांची तब्येत चांगली आहे. ते या शिबिरात दुपारी २ वाजता दाखल होतील. दुपारी ४ वाजता त्यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल.
https://twitter.com/NCPspeaks/status/1588822583830802432
तसेच जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, सुषमा अंधारे यांना जळगाव येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. यावरून व्यक्तिस्वातंत्र्यावर किती गदा आली आहे हे स्पष्ट होते. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीने तो दिला आहे. एखाद्याने काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे तसेच ऐकणाऱ्यांनी काय ऐकायचे हे देखील त्यांचे ते ठरवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलून न देणे हे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरद पवार साहेबांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. सर्व पक्ष एकत्रित येण्यावर जास्त प्राधान्य देतो.
म्हणून Elon Musk यांनी विकत घेतले twitter; आणि दिला CEO यांनाही डच्चू
Ahmednagar News: बाब्बो.. 10 बाय 10 च्या खोलीसाठी 1 लाखांची पाणीपट्टी..! मनपाचा अजब कारभार