NCP Crisis । शरद पवारांनी आखला मोठा डाव, अजित पवारांचे ७ आमदार धोक्यात

NCP Crisis । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी महायुतीची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. दोन्ही पक्षांचे नेते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येतात.

पक्षांच्या चिन्हांवरून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकदा समोरासमोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना दिलेल्या पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असून यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला आहे. कारण शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह अन् अपक्ष उमेदवारांना दिलेले पिपाणी चिन्ह जवळपास सारखेच दिसत होते, यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. शरद पवार गटाच्या उमेदवारांना ज्याचा खूप मोठा फटका बसला.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना दिलेल्या पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दोन्ही चिन्हे सामान्यतः ‘तुतारी’ म्हणून ओळखली जात आहेत, असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नागालँड आमदार अपात्र प्रकरणी बाबत सुप्रीम कोर्टात गेला असून शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ७ आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं होत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या आमदारांना अपात्र केलं नव्हत.

त्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत त्या ७ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. आज उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पहिल्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार असून यावर आता न्यायालय काही महत्वाचे निर्देश देत का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Leave a Comment