Navneet Rana On Asaduddin Owaisi : ’15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा…’ नवनीत राणांचा ओवेसींना इशारा

Navneet Rana On Asaduddin Owaisi: 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा असं म्हणत अमरावतीच्या भाजप खासदार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये ओवेसींना थेट इशारा दिला आहे. यानंतर आता राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारात आयोजित एका जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होते यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे.

 यावेळी नवनीत राणा म्हणाले की, छोटा म्हणतो 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, मग काय करता येईल ते सांगू. मला त्याला सांगायचे आहे की तुला 15 मिनिटे लागतील आणि आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. 15 सेकंद पोलिसांना हटवले तर काय झाले, कोण कुठून आले आणि कुठे गेले हे दोघांना कळणार नाही.

या वक्तव्यानंतर एआयएमआयएमने आता निवडणूक आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण म्हणतात की, नेते निवडणुकीच्या काळात अशी विधाने करत आहेत. अशा विधानांमुळे समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो. भाजप नेते नियमांचे उल्लंघन करण्यापासून मागे हटत नाहीत.

नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे ते म्हणाले. अशा विधानांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. अकबरुद्दीन ओवेसी यांनी 15 मिनिटे पोलिसांना हटवण्याचे वक्तव्य दिल्यानंतर  आत्मसमर्पण केले होते आणि ते तुरुंगातही होते असं देखील वारिस पठाण म्हणाले. नवनीत राणा यांनीही असेच विधान केले असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार. नवनीत राणा तुरुंगात कधी जाणार, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Comment