दिल्ली – रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढत आहे. रशियाने क्रिमियाबाबत पाश्चात्य देशांना इशारा (Russia Warns Other Countries) दिला आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी म्हटले आहे की, क्रिमियन द्वीपकल्पातील कोणतेही अतिक्रमण हे रशियाविरुद्धची घोषणा असेल ज्यामुळे तिसरे महायुद्ध (Third World War) होऊ शकते.

मेदवेदेव म्हणाले, की आमच्यासाठी क्रिमिया रशियाचा भाग आहे आणि तो कायमचा आहे. क्रिमियावर अतिक्रमण करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा. नाटो (NATO) आघाडीकडून क्रिमियावर (Crimea) अतिक्रमण करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल. मेदवेदेव हे सध्या रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. जर स्वीडनसारखे (Sweden) देश नाटोमध्ये सामील झाले तर रशिया आपल्या सीमा अधिक बळकट करेल आणि प्रतिशोधासाठी तयार असेल.

दरम्यान, युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. रशियाला 103 वर्षांच्या इतिहासात प्रथमच परदेशी कर्ज (Foreign Loan) परत करण्यात अपयश आले आहे. युद्धानंतर अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या व्यापारावर बंदी घातली होती. जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या व्यवहारांवर बंदी घातल्यानंतर, रशियाने त्याच्या स्थानिक चलनात, रुबलमध्ये पैसे देण्याची ऑफर दिली, जी अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या इतर देशांनी नाकारली. 27 मे रोजी रशियाला विदेशी कर्जावर $100 दशलक्ष व्याज द्यायचे होते, ज्यावर एक महिन्याचा वाढीव कालावधी होता.

ही वेळ देखील रविवारी 26 जून रोजी संपली आणि तांत्रिकदृष्ट्या रशियाने या कर्जावर डिफॉल्ट (Default) केले, जे 1918 नंतर प्रथमच आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की रशियासाठी ही फारशी अवघड गोष्ट नाही. कारण, महागाईचा दर (Inflation Rate) दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचल्याने आणि अर्थव्यवस्थेतील घसरणीचे अंदाज हे आणखी आव्हान पेलत आहे. युद्धानंतर सर्व निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियाच्या रोखे बाजारावर मार्चपासून दबाव आहे, तर त्याच्या मध्यवर्ती बँकेच्या परकीय चलनाचा साठाही ठप्प झाला आहे.

Russia Ukraine War : रशिया ‘तेथे’ प्रथमच ठरलाय अपयशी; पहा, काय घडले जागतिक अर्थकारणात..

Share.

Leave A Reply

Exit mobile version