Nationl-Internaional News : पंजाब नॅशनल बॅंकेत (Punjab National Bank) १३,५०० कोटींचा घोटाळा (Scam) करून फरार झालेला नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातच आता मला भारतात पाठवलं तर, आपली हत्या होईल. अथवा तुरुगांत आपण आत्महत्या करू, असे नीरव मोदीने म्हटलं आहे. नीरव मोदीच्या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत आहे. सध्या नीरव मोदी लंडनमधील तुरुंगात आहे.
- India : ‘त्या’ मुद्द्यावर तब्बल 143 देशे गेले रशिया विरुद्ध; भारतानेही केले ‘हे’ महत्वाचे काम; जाणून घ्या..
- IDBI Bank Privatization : अजून एका बँकेचे होणार खाजगीकरण
- Bitcoin scam मुळे पोलीसही गांगरले..! सरकारलाही ‘त्याने’ घातलाय मोठा डल्ला..!
नुकत्याच सुनावणी पार पडलेल्या लंडन उच्च न्यायालयात (Londan High Court) नीरव मोदीने भारतात करण्यात येणाऱ्या प्रत्यर्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे. नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड (Arthar Road Jail) कारागृहात ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कारागृहात यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या (Sucide) केल्या आहेत. नीरवला भारतीय कारागृहात हत्या (Murder) होण्याची भिती आहे. त्याचा मानसिक आजार वाढला असून, त्यासाठी दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. नीरवच्या आईने देखील आत्महत्या केली होती. त्यामुळे तो नैराश्यात (Depression) गेला आहे, असे यावेळी नीरव मोदीचे मानसोपचारतज्ज्ञ प्राचार्य अँड्र्यू फॉरेस्टर (Psychiatrist Professor Andrew Forrester) यांनी सांगितले.
भारतात नीरव मोदीचा खाजगी मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येईल. त्याच्यासह आणखी एका कैद्याला त्याच्या सोबत राहण्याची परवानगी असेल. तसेच, नीरव आठवड्यातून एकदा कुटुंबाला भेटण्याची परवानगी असेल तर त्याला त्याच्या वकिलाला रोज भेटायची परवानगी असेल. त्याला ठेवण्यात येणाऱ्या कारागृहात पंखे, वीजेची ठिकाणं काढून टाकण्यात येतील. तसेच, कारागृहात एका खिडकी काढली जाईल. त्यातून नेहमी त्याच्यावर नजर ठेवण्यात येईल, असे भारताची बाजू मांडताना हेलन माल्कम केसी (Helen Malcolm Casey) यांनी म्हटलं आहे.
लंडनमधील उच्च न्यायालयाने नीरव मोदी प्रत्यार्पण प्रकरणी बुधवारी तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवला आहे. राजनैतिक आश्वासने आणि मानसिक आरोग्य यावरील लांबलचक प्रदर्शनावरून असे सूचित होते की न्यायालयाचा निकाल हा भारत आणि यूके या दोन्हींना नियंत्रित करणार्या प्रत्यार्पण कायद्याच्या मूलभूत क्षेत्रांवर एक आदर्श असू शकतो. नीरव मोदीविरुद्धच्या फसवणूक आणि मनी (Fraud and Money laundring) लाँड्रिंगच्या वास्तविक खटल्यापासून त्याचे नाजूक मानसिक आरोग्य (Mental health) पाहता त्याला भारतात प्रत्यार्पण करणे योग्य ठरेल की नाही या चाचणीकडे लक्ष केंद्रित केले आहे.