नवी दिल्ली : राजकारणात काहीच अशक्य नाही असे म्हटले जाते. याची प्रचिती आज नागालँडमध्ये (Nagaland) घडलेल्या राजकीय घडामोडींवरु पुन्हा एकदा आली. एरव्ही एकमेकांवर सातत्याने टीका करणारे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्तेसाठी चक्क हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) जे चित्र सध्या दिसत आहे नेमके त्याच्या उलट नागालँड या छोट्या राज्यात घडले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नागालँडमधील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीपीचा असा विश्वास आहे, की नागालँडमधील विरोधकांची भूमिका निभावण्यापेक्षा नेफ्यू रिओचे (Neiphiu Rio) नेतृत्व स्वीकारणे चांगले आहे. तथापि, एनसीपी सरकारचा भाग असेल की बाहेरून पाठिंबा देईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
असे मानले जाते की नागालँडमधील नेफ्यू रिओचे नेतृत्व स्वीकारण्याच्या एनसीपीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसून येईल, जेथे एनसीपी, काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे गट यांची एकत्रित महाविकास आघाडी आहे.
नागालँड विधानसभा निवडणुकीत एनसीपीने 7 जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ईशान्य प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
एनसीपी विधानसभेच्या पक्षाची पहिली बैठक कोहिमा येथे झाली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नव्याने निवडलेले आमदार आणि पक्षाच्या राज्य युनिटचे मत होते की पक्ष सरकारचा भाग असावा. तथापि, अंतिम निर्णय शरद पवार यांच्यावर सोडला होता. त्यानंतर त्यांनी नेफ्यू रियो यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला.
एनडीपीपी-भाजपा युतीला जवळजवळ सर्व पक्षांनी बिनशर्त समर्थन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलजेपी (रामविलास), आरपीआय, जेडी (यू) यांनी आधीच पाठिंब्याची पत्रे दिली आहेत. या घडामोडींचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होईल का याच्या चर्चा आता सुरू झाल्य आहेत. येथे सध्या भाजप सत्तेत आहे. आणि महाविकास आघाडी विरोधात आहे. या आघाडीत कधीकाळी भाजपबरोबर असलेले उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत.