National Pension Scheme : उशीर करु नका, आजच पत्नीच्या नावाने उघडा ‘हे’ खाते, दरमहा मिळणार 45 हजार रुपये

National Pension Scheme: जर तुम्ही भविष्याचा विचार करून आत्तापासूनच गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नॅशनल पेन्शन सर्वात भारी पर्याय ठरू शकते. या स्कीममध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा दरवर्षी पैसे जमा करू शकता.

 या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांमध्येही खाते उघडू शकता. जर तुम्ही मासिक 5,000 रुपये गुंतवल्यास, तुमच्या पत्नीचे वय 60 पूर्ण झाल्यावर तुम्हाला मासिक पेन्शनच्या स्वरूपात चांगला परतावा मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 65 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता.

जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या नावावर NPS उघडले आणि मासिक 5,000 रुपये जमा करा. जर एखाद्याला येथे गुंतवणुकीवर 10 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर, व्यक्ती 60 वर्षांच्या वयापर्यंत आपल्या खात्यात 1 कोटी 12 लाख रुपये जमा करू शकेल.

त्यानंतर त्याला सुमारे 45 लाख रुपये मिळतील. उर्वरित काळात त्यांना दरमहा 44 हजार 793 रुपये मिळत राहतील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ही पेन्शन रक्कम त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर मासिक मिळत राहील.

वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शनचा लाभ मासिक असेल

NPS मध्ये गुंतवणूक केल्यास 10 टक्के वार्षिक परतावा मिळतो. पत्नीच्या खात्यात दर महिन्याला 5 हजार रुपये जमा केले तर सुमारे 1 कोटी 12 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होतील. 60 वर्षांसाठी पैसे जमा केल्यास तुम्हाला 45 लाख रुपये मिळतील. त्यानंतर तुम्हाला दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहतील.

तुम्हाला हे हवे असेल तर आजच हे खाते उघडा. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने NPS मध्ये खाते देखील उघडू शकता. निश्चित रक्कम मासिक जमा केल्यावर, त्यांना वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम मिळेल.  यामुळे तुमच्या पत्नीला इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

तुम्हाला 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा मिळेल

एनपीएस ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. यामध्ये, ग्राहकाने गुंतवलेले पैसे फंड व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केले जातात, त्यामुळे तुमची गुंतवणूक NPS मध्ये केली जाते आणि ती पूर्णपणे सुरक्षित राहते. वित्तीय नियोजकांच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

Leave a Comment