दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आठ महिन्यांनंतर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 20 लाखांवर गेली आहे. दैनंदिन संसर्ग दर 18 टक्क्यांच्या जवळ गेला आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर 16.56 टक्क्यांवर गेला आहे. तिसर्या लाटेत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 23 जानेवारी रोजी असणार आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 10,756 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, 17,494 बरे झाले आणि 38 मृत्यूची नोंद झाली. राष्ट्रीय राजधानीत कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 61,954 आहे आणि पॉजिटिविटी दर 5.16 टक्के आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,142 नवीन रुग्ण आढळले असून 17,600 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 95,866 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी ही माहिती दिली.
राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत 15 जणांचा मृत्यू झाला असून 16,878 जणांना कोरोना संक्रमित आढळले आहे. त्यापैकी सर्वाधिक 4035 रुग्ण जयपूरमध्ये आढळले आहेत. सर्व 33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 84,787 वर गेली आहे. केरळमधील कोरोनाच्या प्रकरणांची माहिती देताना आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, की सध्या राज्यात सुमारे 1 लाख 99 हजार अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत, परंतु त्यापैकी फक्त 3 टक्के रुग्णालयात दाखल आहेत, फक्त 0.7%. लोक ऑक्सिजन सपोर्टवर आहेत आणि 0.6% आयसीयूमध्ये आहेत.
शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 3,47,254 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत आणि गेल्या 24 तासात 703 लोकांचा मृत्यू झाला आहे, एकट्या केरळमध्ये 341 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत, एकूण संक्रमित लोकांची संख्या 3.85 कोटी झाली आहे, ज्यात 9,692 ओमिक्रॉन प्रकरणांचा समावेश आहे. अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 20,18,825 पर्यंत वाढली आहे जी 235 दिवसांमध्ये सर्वाधिक आहे आणि एकूण प्रकरणांपैकी 5.23 टक्के आहे. गेल्या एका दिवसात अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 94,774 ची वाढ झाली आहे.
कोरोनाचा धोका वाढला..! ‘या’ राज्यात एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित; पहा, काय आहे परिस्थिती