नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने आता तामिळनाडूमध्ये आपली खास योजना बनवण्यास सुरुवात केली आहे. एआयएडीएमकेमध्ये सुरू असलेल्या मतभेदांचा भाजपला फायदा होऊ शकतो.
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी पक्षाच्या सदस्यांसाठी ध्येय ठेवले आहेत. अन्नामलाई यावेळी प्रतिभावान तरुणांना संधी देण्याची योजना आखू शकतात. पक्षहिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना किंवा निकाल न दाखवणाऱ्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. लोकसभा आणि 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि द्रमुक यांच्यात थेट लढत होईल, असा दावा प्रदेश उपाध्यक्ष एम. चक्रवर्ती यांनी केला आहे.
लोकसभा आणि तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका अजून दूर आहेत. तरी देखील भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तसेही दक्षिणेतील राज्यात कर्नाटक वगळता भारतीय जनता पार्टीचे फारसे अस्तित्व नाही. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या राज्यात भाजप कमी प्रमाणात आहे. काँग्रेसचीही अवस्था फार वेगळी नाही. येथे प्रादेशिक पक्ष बळकट आहेत. आणि हे पक्ष येथे सत्तेत येत असतात. अशा परिस्थितीत या राज्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे भाजपसाठी आव्हानात्मक आहे. तरी देखील भाजपने तयारी सुरू केली आहे. या तयारीचे काय परिणाम येतील हे कळण्यास बराच काळ वाट पहावी लागणार आहे.
- वाचा : आता भाजपने ‘त्या’ निवडणुकांचीही तयारी केली सुरू; पहा, काय आहे जिंकण्याचा प्लान
- गुजरातचे राजकारण तापले..! भाजपने ‘त्यामध्ये’ पुन्हा घेतली आघाडी; पहा, आप-काँग्रेसचा काय आहे प्लान ?