Loan : महिला आज कोणत्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भरतेसह महिला आता उघडपणे कर्ज घेत आहेत आणि कर्जाचा त्यांचा वाटाही वाढत आहे. TransUnion CIBIL ताज्या अहवालानुसार, 2022 मध्ये, 6.3 कोटी महिलांनी कर्ज (Loan) घेतले आणि कर्जातील त्यांचा हिस्सा 28 टक्क्यांपर्यंत पोहोचला. अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत महिला कर्जधारकांची संख्या दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढली आहे, तर पुरुष कर्जधारकांची संख्या 13 टक्क्यांनी वाढली आहे.
अहवालानुसार, महिला त्यांच्या CIBIL स्कोअरबद्दल खूप जागरूक आहेत आणि महिलांना कर्ज देणे पुरुषांपेक्षा कमी धोकादायक आहे. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी महिला बरीच कर्ज घेत आहेत. 2017 ते 2022 दरम्यान व्यवसाय कर्ज घेणार्या महिलांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
या कालावधीत घरे खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असलेल्या महिलांच्या संख्येत सहा टक्के वाढ झाली. अहवालानुसार ग्रामीण भागातील आणि लहान शहरांतील महिला आर्थिक कामांमध्ये अधिक सक्रिय दिसत आहेत. म्हणूनच ग्रामीण आणि लहान शहरांमधील महिला मोठ्या शहरांतील महिलांपेक्षा जास्त कर्ज घेत आहेत.
कर्जातील वाढ 14 टक्के
अहवालानुसार 2017 ते २०२२ या कालावधीत, ग्रामीण आणि लहान शहरांमधील महिलांनी घेतलेल्या कर्जातील वाढ दरवर्षी 18 टक्के होती तर मोठ्या शहरांतील महिलांचे कर्जाचे प्रमाण 14 टक्के होते. बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानच्या महिला कर्ज घेण्याच्या दृष्टीने इतर राज्यांपेक्षा पुढे आहेत. सन २०२२ मध्ये प्रथमच कर्ज घेतलेल्या महिलांनी कृषी कर्ज किंवा टीव्ही, फ्रीज यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले.
कर्ज घेण्याबरोबरच महिलांना त्यांच्या आर्थिक सुरक्षा व्यवस्थेबद्दलही माहिती आहे. पॉलिसी बाजारनुसार (Policy Bazar) आरोग्य विमा खरेदी करणार्या लोकांची संख्या सध्या मोठ्या शहरांमध्ये अधिक आहे. परंतु, छोट्या शहरांमध्येही महिलांना आरोग्य विमा (Health Policy) खरेदी करण्यात रस आहे. महिलांचा आरोग्य विमा खरेदी करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे.