National Highway: पुणे : आपण वाहन चालक असाल किंवा नियमित प्रवासी असाल तर आपणास डांबरी रोडावरून जाताना जो अनुभव येतो तो सीमेंट रोडावरून जाताना येत नसल्याचे वाटत असेल. अनेकांना असाच अनुभव वाटतो. डांबरी रस्त्यावरून जाताना सीमेंट रस्त्याच्या तुलनेत आल्हाददायक वाटल्याचे अनेकजण सांगतात. मात्र, आता भाजप सरकार आणि मुख्य म्हणजे मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात सगळीकडे रस्ते सरसकट सीमेंट कोंकरिटचेच (BJP government and chief minister Nitin Gadkari, roads are being made of cement concrete everywhere) होत आहेत. त्यामुळे तसाही सामान्य जनतेपुढे आता पर्याय नाही. तर, आता आपण पाहुयात की याबाबत काय स्थिती आहे. (What do you think.. asphalt or concrete road is best; Click to read information)
क्वॉरा यावर चर्चेत म्हटले आहे की, सिमेंटचे रस्ते हे तुलनेत २० पट महाग पडतात. तेव्हा कमी पैशात जास्त लोकांना सुख, सुविधा पुरवायची असेल तर डांबर रोडचा पर्याय स्वीकारला जातो. तर, डांबर रोड जास्त (Flexible) नरम, आरामदायी आणि यावर झटके कमी लागतात. तसेच डांबर रोड काळ्या रंगाचे असल्याने यावर वाहन चालकांना गाडी चालवताना डोळ्यांना त्रास तुलनेने कमी होतो. मात्र, डांबर दोन ते तीन वर्षांत ठिसूळ होतात आणि खड्डे पडू लागतात. अशावेळी मग पुन्हा पुन्हा डांबरीकरण करावे लागते. सिमेंटचे रोड एकदा बनले की मग लवकरच खराब होत नाहीत.
तसेच जिथे खूप आणि दिवसरात्र वाहतूक असते, अशा महामार्गावर पुन्हा-पुन्हा डांबरीकरण करणे शक्य होत नाही. तिथे मग अशावेळी एकदाच वाहतूक वळवून सिमेंट काँक्रीटिंग रस्ते बनवले की कटकट कायमची मिटते. यासह भारतातील तीव्र उन्हाळ्यात डांबरी रस्ते वितळतात, असेही तज्ञांना वाटते. मग सिमेंट रस्त्याचे पर्याय परवडतात. मात्र, पैशाअभावी सगळे रस्ते सिमेंटचे करणे शक्य होत नाही. मग जिथे खूप वाहतूक आहे, तिथे सिमेंट रस्त्याचे पर्याय सरकारकडून निवडले जातात.
देशात आता BOT (Build, Operate & Transfer) म्हणजे बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा हे तत्व स्वीकारले जात आहे. त्यात कोणीही आपल्या पैशाने रस्ते बांधून, ते मेंटेनन्स करून, टोलद्वारे पैसे वसूल करतात आणि मग रस्ते सरकारला परत करु शकतात. त्यामुळे सरकारला यासाठी पैश्याची चिंता राहात नाही. म्हणून मग आता मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते बनवणे शक्य होत आहे. देशात असे तत्व मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे यासाठी नितीन गडकरींनी सर्व प्रथम स्वीकारले. त्यावेळेस ते महाराष्ट्र राज्यात शिवसेना-बिजेपी सरकारात बांधकाम मंत्री होते. सरकार मग आपला पैसा ग्रामीण भागातील रस्ते, जिथे टोल वसुली वाहतूक नसल्याने शक्य नसते, तिथे वळवते आणि ते रस्ते चांगले होतात.
अशोक हेंद्रे लिहितात की, योग्य पध्दतीने तयार केलेला चांगला डांबरी रस्ता हा सिमेंट रस्त्यापेक्षा आयुष्य कमी असले तरी त्यास तात्पुरती डागडुजी करता येते. यातून त्याचे आयुष्य कमी खर्चात वाढविता येते. अर्थात त्याचा उप-फायदा रोजगार निर्मितीस उपयोग होतो. म्हणजे दरवर्षी दुरुस्ती टेंडर काढून नेते मंडळींना काम केल्याचे कार्य भोळ्या जनतेला दाखविता येते. सिमेंट रस्त्यावर खड्डे पडलेतर ते डागडुजी करुन दुरुस्त करता येत नाहीत. ते ब्रेकर लावूनच तोडावे लागतात. हा खर्च ही बऱ्यापैकी मोठा असू शकतो.
प्रवीण काळे म्हणतात की, भारतात दोन्ही प्रकारचे म्हणजे सिमेंटचे व डांबरी रस्ते आहेत. परंतु, डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंटचे रस्ते उत्तम. सिमेंटचे रस्ते बनवायाला कमी वेळ आणि ते जास्त टिकाऊ असतात. मात्र, सीमेंट व डांबर असे दोन्ही प्रकारचे रस्ते पर्यावरणासाठी घातक आहेत. जपानला गेलो होतो. तर, तेथे डांबर वा सिमेंट वापरत नाही. एक दुसरी टेक्नॉलजी ते वापरतात . तेथे एकाही रस्त्याला खड्डा आढळला नाही.