दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 3207 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 7 टक्के कमी आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. यासह देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या 5,24,093 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे एकूण अॅक्टिव्ह रुग्ण (Corona Active Patient) 20 हजार 403 आहेत. तर 24 तासांत 3 हजार 410 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 42,560,905 लोक कोरोना या घातक आजारातून बरे झाले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत सलग अनेक दिवस कोरोनाची एक हजाराहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. रविवारी, कोरोना विषाणू संसर्गाची 1,422 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. मात्र, मृत्यूचे नवीन प्रकरण समोर आलेले नाही. त्याच वेळी, संसर्ग दर 5.34 टक्के आहे.
ओडिशाच्या (Odisha) जिल्ह्यातील दोन वसतिगृहात राहणारे 64 विद्यार्थी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, रविवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे 71 नवीन रुग्ण आढळले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 12,88,202 झाली आहे. संसर्गामुळे मृत्यूची कोणतीही नवीन प्रकरणे नोंदली गेली नाहीत, त्यामुळे मृतांची एकूण संख्या अजूनही 9,126 आहे.
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. 26 एप्रिलपासून दररोज 3 हजारांहून अधिक प्रकरणे सापडत होती. जे 29 एप्रिलला सर्वाधिक पातळीवर होते. तेव्हापासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 26 एप्रिलनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकूण प्रकरणांची संख्या 3 हजारांच्या खाली गेली आहे. 26 एप्रिल रोजी 2927 प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर 27 एप्रिलला 3303, 28 एप्रिलला 3377, 29 एप्रिलला 3688, 30 एप्रिलला 3324 आणि 1 मे रोजी 3157. काल कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या 3 हजारांच्या आत होती. आज मात्र पुन्हा नव्या कोरोना रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा पार केला आहे.
Corona Update : आजही कोरोनाचे मीटर जोरात.. पहा, 24 तासात किती रुग्ण सापडले..