नवी दिल्ली : G-20 चे अध्यक्षपद यंदा भारताला मिळाल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सदस्य देशांमधील चक्रीय परिभ्रमण पद्धतीने ते अध्यक्षपद यंदा भारताला मिळणे अपरिहार्य होते. अनेक देशांनी अध्यक्षपद भूषवल्यानंतर भारताला G-20 चे अध्यक्षपद मिळणे स्वाभाविक होते, पण मोदी सरकार जेवढे हायव्होल्टेज ड्रामा करत आहे, तेवढे इतर कोणत्याही देशाने केले नव्हते, असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.
1 डिसेंबरपासून G-20 चे भारताचे अध्यक्षपद सुरू झाले असून त्याच्या सुरुवातीच्या निमित्ताने पुढील एक वर्षाच्या कार्यक्रमांची आणि बैठकांची रूपरेषा यावर बरीच चर्चा होत आहे. काँग्रेसचे कम्युनिकेशनचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याला विशेष उपलब्धी म्हणून सादर करण्यावर ट्विटद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे.
जयराम म्हणाले, की ‘जी-20 चे अध्यक्षपद रोटेशनवर आहे आणि भारताचे अध्यक्षपद अपरिहार्य आहे. याआधीचे G-20 अध्यक्ष अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण कोरिया, फ्रान्स, मेक्सिको, रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की, चीन, जर्मनी, अर्जेंटिना, जपान, सौदी अरेबिया, इटली आणि इंडोनेशिया आहेत. यातील एकाही देशाने असा हाय व्होल्टेज ड्रामा कधीच केला नाही. जसे की सध्या होत आहे. ट्विटच्या दुसऱ्या भागात पीएम मोदींवर निशाणा साधत जयराम म्हणाले, की’लालकृष्ण अडवाणींनी गांधीनगरमध्ये 5 एप्रिल 2014 रोजी जे सांगितले होते ते मला आठवते – त्यांनी मोदींना महान इव्हेंट मॅनेजर म्हटले होते. आणि G-20 च्या निमित्ताने आता तसेच घडत आहे.
काँग्रेसने केलेल्या या टीकेवर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या मुद्द्यावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- IMP News : भाजप ‘या’ मिशनच्या तयारीत..! दोन दिवसांनंतर राजधानीत होणार खास बैठक; जाणून घ्या डिटेल..
- भाजपमध्ये जोरदार हालचाली..! निकालाआधी ‘त्या’ 68 उमेदवारांकडून घेणार ‘हा’ अहवाल; जाणून घ्या..