नवी दिल्ली : देशातील H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांबाबत आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, की राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे, की आत्तापर्यंत कर्नाटक आणि हरियाणामध्ये H3N2 मुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. या माहितीनंतर, H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्र सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यांबरोबर काम करत आहे. सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, भारत सरकार परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
दरम्यान, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, आतापर्यंत हरियाणात H3N2 विषाणूचे 10 रुग्ण आढळले आहेत. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, घाबरण्याची गरज नाही. हे H1N1 सारखे आहे, अगदी सौम्य. त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आम्हाला ऑक्टोबरमध्ये केरळमध्ये इन्फ्लूएंझाची प्रकरणे आढळून आली होती आणि एक परिपत्रकही जारी केले होते. तापाच्या रुग्णांचे नमुने इन्फ्लूएंझा चाचणीसाठी पाठवण्यास डॉक्टरांना सांगण्यात आले आहे. सध्या आमच्याकडे 2 प्रकरणे आहेत.