Selfie Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महिला लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी भाजप महिला मोर्चा सोमवारपासून देशव्यापी मोहीम राबवणार आहे. महिलांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात पक्षाच्या सदस्यांनी वर्षभरात त्यांच्यासोबत एक कोटी सेल्फी (Selfie Campaign) घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भाजप (BJP) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सेल्फी विथ बेनिफिशरीमध्ये (Selfie With Beneficiary) एक कोटी लाभार्थींसोबत सेल्फी काढणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आम्ही एक नवीन अॅप लॉन्च केले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या उज्ज्वला योजना (Ujjwala Gas ) किंवा आयुष्मान कार्ड (Ayushman Bharat) योजनेसारख्या लाभार्थ्यांची माहितीसह सेल्फी घेऊन अॅपमध्ये अपलोड करतील.
- Sim Card Rules: मोठी बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही नवीन सिम ; जाणुन घ्या कारण
- Aadhaar Card: सावधान! चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बनवणाऱ्यांवर होणार ‘ही’मोठी कारवाई; सरकारने दिली माहिती
- Maharashtra IMD Alert & Weather Forecast: शेतकऱ्यांनो तयारीत रहा; ‘त्या’ दिवशी होणार आहे अवकळी पाऊस
- WhatsApp New Features: भारीच.. आता व्हाट्सअप फोटोंमधून टेक्स्ट होणार कॉपी! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट
- आनंदाची बातमी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे OnePlus चा नंबर 1 5G स्मार्टफोन; पहा ऑफर
यासाठी महिला शाखेच्या कार्यकर्त्यांना लाभार्थीसोबत सेल्फी कसा घ्यायचा आणि त्यांचे सर्व तपशील कसे अपलोड करायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची भाजपची तयारी जोरात सुरू आहे.पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर महिला मतदार निर्णायक आहेत, असा विश्वास ठेवून पक्षाची महिला मोर्चा टीम अर्ध्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू करत आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख वनाथी श्रीनिवासन यांनी सांगितले की, पक्षाच्या महिला शाखा मार्चमध्ये दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या नावाने पुरस्कार वितरण समारंभ सुरू करेल, ज्यामध्ये विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यातील 10 महिलांचा सत्कार केला जाईल.
पक्षाच्या महिला शाखेच्या सदस्य प्रत्येक जिल्ह्यातील महिला मतदारांशी संपर्क साधतील आणि त्यांना घरापासून स्वयंपाकाचा गॅस, बँक खाते उघडण्यापर्यंतच्या विविध सरकारी योजनांच्या फायद्यांविषयी माहिती देतील. श्रीनिवासन म्हणाल्या की, जर या महिलांना यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला असेल तर पक्षाचे सदस्य त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती करतील.
एकट्या जन धन योजनेचा 25 कोटींहून अधिक महिलांना फायदा झाल्याचे मानले जाते, ज्या अंतर्गत कोणत्याही अनिवार्य किमान शिल्लक न ठेवता बँक खाती उघडली जातात, तर इतर योजनांच्या लाभार्थींची संख्याही कोटींच्या घरात आहे.