दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुका आणि दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकांनंतर भाजपने नव्या लक्ष्याची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी दिल्लीत सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
वृत्तसंस्थेतील सूत्रांचे म्हणणे आहे की, या बैठकीत पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये होणाऱ्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका, तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर चर्चा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्व राज्यांचे प्रभारी व सहप्रभारी, विविध आघाड्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, राज्यांचे संघटन सरचिटणीस या बैठकीतही सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी 6 डिसेंबर रोजी समापन सत्राला उपस्थित राहू शकतात. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, बैठकीत सरकारच्या यशाबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली जाईल. जेपी नड्डा अध्यक्ष असतील. बैठकीत संस्थेच्या कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे. G-20 चे भारताचे अध्यक्षपद हे एक मोठे यश मानून पक्ष त्यासंबंधित कार्यक्रमांची रूपरेषाही आखणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडले. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
- वाचा : Uddhav Thackeray-BJP politics: ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप; त्याप्रकरणी केलाय विश्वासघात
- Gujarat Election : बाब्बो.. गुजरातच्या निवडणुकीत इतके कोट्यधीश मैदानात; पहा, किती जणांना मिळाले तिकीट ?