Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रासह ‘त्या’ १० राज्यांत होणार विशेष प्रकल्प; पहा मोदी सरकार कोणता महत्वाचा निर्णय घेणार..!

नाशिक / नागपूर : जंगले नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळे अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. काही वर्षांपासून त्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीत येतात. यामुळे मानव आणि प्राण्यांतील संघर्ष वाढत चालला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जर जंगलातच चारा आणि पाण्याची व्यवस्था केली तर फायदा होईल, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार केंद्र सरकारने आता असाच निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement

या समस्येची जाणीव झाल्याने आता केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या वन्यप्राण्यांना जंगलातच चारा आणि पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जंगलांमध्ये नवीन जलाशय तयार केले जाणार आहेत, यामुळे पाण्याचा प्रश्न मिटेल आणि पाणी मिळाल्यामुळे येथे चाऱ्याचाही प्रश्न आपोआप मिटेल, असे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात दहा राज्यात प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, गोवा, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, सध्या शहरीकरण, औद्योगिकरनाच्या नावाखाली जंगले नष्ट होत आहेत. मानवनिर्मित या संकटाचा त्रास मात्र वन्यप्राण्यांना सहन करावा लागत आहे. जंगले नष्ट होत आहेत एका अर्थाने या प्राण्यांचे घरच नष्ट होत आहे. मग, त्यांना चारा आणि पाणी तरी कसे मिळणार, त्यामुळे हे प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीत येत आहेत. अनेकदा शेती पिकांचे सुद्धा नुकसान करत आहेत. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जलाशय तयार केल्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकावे लागणार नाही. जंगलात पाणी उपलब्ध झाल्यामुळे चाऱ्याचाही प्रश्न कमी होईल. वन्यप्राणी मानवी वस्त्यांत येण्याचे प्रमाण कमी होईल. अन्न व पाण्याच्या शोधात असताना बऱ्याचदा या प्राण्यांना वाहनाच्या धडकेत प्राण गमवावे लागतात. त्यामुळे या घटनांना सुद्धा आळा बसेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply